पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ मुंबईतील बारा वर्षे. देणार नाहींत, तिच्याकरितां आमच्या आम्हींच झटापटी केल्या पाहिजेत, एवढे त्यांस वाटत असे, आणि जरी त्यांनी निव्वळ स्वातंत्र्याची आकांक्षा धरणाऱ्या कित्येक चळवळीस थोडीफार मदत केल्याच्या आख्यायिका असल्या, तरी तें केवळ त्यांच्या सर्व प्रयत्नांना उत्तेजन देण्याच्या व्यापक धोरणामुळेच होय. मनुष्याचा स्वभाव व त्याच्या कल्पना या नेहमींच परस्परास धरून असतात असे नाही. तरीपण त्याच्या स्वभावाची छाया त्याच्या कल्पनांवर व प्रयत्नांवर पडते. यामुळेच रानड्यांच्या सर्व प्रयत्नांत आणि कल्पनांत हा एक मोठाच दोष आढळून येतोः – रानड्यांची बुद्धि अतीशय विशाल आणि स्वभावांत सौजन्य तर पुष्कळच होतें. परंतु या अतिसौजन्यामुळेच अथवा एक प्रकारच्या भित्रेपणामुळे त्यांच्या कोणत्याही चळवळीचा चळवळ करणाऱ्याच्या मनांत नवीन राष्ट्रीय जोम उत्पन्न होईल, असा उपयोग होण्याजोगा नव्हता. उलट, त्या सर्वांची उभारणी एक प्रकारच्या हीनतेच्या जाणिवेवर झाली असल्यामुळे त्यांच्या सर्व चळवळी व संस्था दुसऱ्या कोणीतरी उचलून न धरल्यामुळे निस्तेज झाल्या; व स्वतः त्यांच्या आचरणांत देखील कौटुंबिक गुणांचा उत्कर्ष असल्यामुळे, त्यांचें सर्व चरित्र कितीही मोठें अर्से वाटलें, तरी त्यांच्या खऱ्या योग्यतेच्या मानानें एक प्रकारें वांया गेलेले दिसतें. मुंबईस आल्याबरोबरच रानड्यांची व अण्णासाहेबांची जूट झाली, व दोघांनी मिळून पुढे कित्येक गोष्टी बरोबरच केल्या, म्हणून त्यांच्या स्वभावाचा एवढा प्रपंच करणे भाग पडतें. वयानें रानड्यांपेक्षां अण्णासाहेब चार पांच वर्षांनी लहान होते, परंतु बुद्धिमत्ता, व्यासंग, कर्तृत्व, धडाडी. देशहिताची कळकळ, उपद्व्यापीपणा आणि वजन यामुळे लौकरच दोघेही एकाच कार्यांतील जोडीदार झाले. राष्ट्रकार्यांतील उमेदवार म्हणून ज्याप्रमाणे टिळक वगैरे मंडळी रानड्यां- पाशी आली, असा संबंध त्यांचा व अण्णासाहेबांचा कधींच आलेला नाही. दोन कार्यकर्ते एकत्र व्हावे, त्याचप्रमाणे त्यांचा संबंध आला. दोघांनी मिळून दोघांचें पटेनासें होतांच, एकमेकांस सोडून ते कांही कार्य केलें; आणि आपापल्या मार्गास लागले. रानड्यांच्या प्रमाणेच, सर्व बाजूंनी राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे, असे अण्णासाहेबांस वाटत होतें; परंतु आमच्या राष्ट्रीयत्वाच्या कांही कल्पना