पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रोन्नतीविषयी अण्णासाहेबांचे विचार. २७ त्यांचेजवळ सिद्ध होत्या, व त्याबरोबरच इंग्रजी संस्कृती ही शेणाच्या चित्रा- प्रमाणे कुचकामाची व टाकाऊ आहे, असे त्यांनी ओळखिलें होतें. यामुळे, त्यांचा मुख्य भर देशांत तेजस्विता उत्पन्न व्हावी, इंग्रेजी शिक्षण व संस्कृती यांतील प्रसंगोचित गोष्टी आपल्या लोकांनी संपादाव्या, व त्यांविषयों फाजील भ्रम न बाळगितां एक उन्नतीचें साधन ह्मणून त्यांचा उपयोग करावा, आमचें राष्ट्रीयत्व सुटणार नाही, अशा रीतीनें आमच्या सर्व सुधारणा व्हाव्या, व जरी कदाचित् इंग्रज लोक राज्यकर्ते झाले असले, तरी त्यांची साधनें मिळाली असतां आह्मीं सर्व तऱ्हेनें त्यांच्याहून श्रेष्ठ होऊं शकतों, हें सिद्ध करून दाखवावें, असे त्यांस वाटत असे. जित राष्ट्राच्या मनावर जी एक प्रकारची विक्लवता उत्पन्न होते, ती काढून टाकली असतां, हिंदुस्थानचा अधिकार हिंदु लोकांनीच केला पाहिजे, हे आमच्या लोकांस जेणेकरून पटेल, तो तो देशोन्नतीचा मार्ग, असे त्यांस वाटत होतें. त्यामुळे, रानडे प्रभृति मंडळी यांच्यांत, व अण्णासाहेब यांच्यांत मोठा फरक होता; तो हा कीं. सर्व तऱ्हेनें उन्नती झाली असतां राजकीय स्वातंत्र्य मिळेल असें रानडे वगैरेंस वाटत असे, आणि राजकीय स्वातंत्र्य जर मिळेल तर सर्व तऱ्हेची उन्नति सहज घडवून आणतां येईल, अशी अण्णासाहेबांची ठाम समजूत होती. • तरीपण दोघांमध्ये एक गोष्ट सारखी होती, तीं ही की, आहे ही स्थिति अवनतीची असून कालाला अनुसरून तिची नवी घडी बसविली पाहिजे, असें दोघांसही वाटत होतें. हाच वासुदेव बळवंत वगैरे निव्वळ बंडखोर ठरलेल्या लोकांशी अण्णासाहेबांचा विरोध होता. अशा तऱ्हेनें एका बाबतीत साम्य असल्या- मुळे महादेव गोविंद रानड्यांशी त्यांनी सहकार्य केलें. . मुंबईस आल्यावर अण्णासाहेब व आबाजीपंत हे सुप्रसिद्ध अण्णा मोरेश्वर कुंटे ( हे त्या वेळी मेडिकल कॉ० मध्ये शिकत होते ) त्यांचेकडे उतरले, आणि त्यांनी लाक्लास मध्ये नांव दाखल केले. ब्राह्मण लोकांपैकी मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळेस अण्णा मोरेश्वरच होते. मेडिकल कॉलेज हैं बहुतकरून पारशी लोकांनी भरलेले असे, आणि तात्या लोकांच्यानी हें काम होणे शक्य नाही, अशा समजुतीनें अण्णासारख्या एकट्या दुकट्याचा कमालीचा उप- हास होत असे, व त्यांना त्रासही बराच दिला जाई. त्यामुळे विद्यार्थीही सहसा टिकत नसत. अशा स्थितीत कुंट्यांना अशी ईर्ष्या वाटे कीं, चांगल्या चांगल्या