पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ मुंबईतील बारा वर्षे. 'विद्यार्थ्यांनी मुद्दाम मेडिकल कॉलेजमध्यें यावें, व पारश्यांची ही ऐट जिरवून दाखवावी. एक दिवस सहज मेडिकल कॉलेज दाखविण्यासाठी म्हणून ते अण्णा- साहेब व आबाजीपंत यांस घेऊन गेले, आणि कॉलेज पाहणें झाल्यावर त्यावे- ळचे प्रिन्सिपाल डॉ० हंटर यांची व या तरुण ग्राज्युएटांची त्यांनी ओळख करून दिली. साहेब बहादुरांनी औपचारिक चौकशी केल्यावर, ' हे आतां येथे कोणच्या इराद्यानें आले आहेत ? ' म्हणून अण्णांस विचारलें. तेव्हां ' मेडि- कल कॉलेजमध्येच दाखल होण्याकरितां हे आपल्याकडे आले आहेत, ' म्हणून कुंट्यांनी चापून ठोकून दिलें! आणि एकदां त्यांनों असे सांगितल्यावर पाय मागें घेणें हें अण्णासाहेबांस शक्य नव्हतें. तेव्हां त्यांनींही मान हलवून रुकार दिला ! अशा रीतीनें ध्यानीं मनींही नसलेलें वैद्यशास्त्र त्यांच्या गळीं पडलें ! कोणतीही गोष्ट एकदां करावयास घेतली म्हणजे ती अपुरी करणे त्यांस माहितच नव्हतें. इंग्रजी वैद्यकाचा अभ्यास सुरू केल्याबरोबरच आर्य वैद्यकाचा अभ्यास करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली, आणि पेशवाईतील पिढीजाद वैद्य लागवणकर यांच्या घराण्यांतील त्यावेळचे प्रसिद्ध महादेवशास्त्री लाग- वणकर वगैरे दोघांतिघांपाशीं आर्य वैद्यकाचें शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. शिक्षणाची दुधारी तलवार पडदळास लटकविल्यावर इतर विषयांकडे लक्ष देण्यास हळूहळू सुरुवात झाली. वेगवेगळ्या मतांच्या व वेगवेगळ्या दर्जाच्या सर्व समाजांत यांचा निरनिराळ्या संबंधानें प्रवेश होता. कोठें विद्यार्थी या नात्यानें, कोठें श्रीमंत गृहस्थ म्हणून, कोठें सहकार्यकर्ता, अशा अनेक प्रकारांनी अनेक चळवळींस त्यांना हात घालतां आला. मुंबईस आल्यावर मुरारजी गोकुळदास यांचे चाळीत त्यांनी आपलें ठाणें दिलें, आणि पुढील १२ वर्षे हेच त्याचें मुख्य स्थान होतें. चाळीचा वरचा मजला सबंधचा सबंध भाड्यानें घेतलेला होता. श्रीअण्णासाहेब हे तेथें मोठ्या श्रीमंती थाटाने राहात असत. स्वयंपाकी, पाणके, नोकरचाकर मोल- करणी वगैरे सर्व सरंजाम उत्तम असून राहणी फार खर्चाची होती. नाना प्रकारचे लोक अखंड यांचे येथें पडलेले असत, आणि पानतंबाखु वगैरेंचा सपाटून चूर होत असे. मुरारजी शेट हे त्यावेळीं J. P. होते. लवकरच त्यांचा अण्णासाहेबांवर फार लोभ जडला, व लोकरच त्यांच्याविषयीं मुरारजींच्या मनांत