पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० मुंबईतील वारा वर्षे. सर्वव्यापी योग्यतेमुळे, लौकरच मुंबईतील उच्च दर्जाच्या सर्व वर्गात यांचें वजन बसलें. खारेपिस्ते विकणाच्या एकाद्या फेरीवाल्यापासून तो मुंबईच्या अतीशय श्रीमान् गृहस्थापर्यंत सर्व तऱ्हेच्या गुणांचे व विद्यांचे लोक येथें वेळोवेळीं जमत असत. विद्वत्तेचा तर अर्थातच येथें पूर वाहत असे. वाद- विवाद, कोटिक्रम, थट्टामस्करी, टारगेपणा वगैरेंचा तर पाऊस पडत असे. या इतक्या सर्व गोष्टींस पुरे पडून ज्याच्या त्याच्या परी त्याला जिव्हाळा लावून, निरनिराळ्या तऱ्हेची कामें लोकांकडून करून घ्यावीं, व पुन्हा एकमेकांचा एकमेकांस सुगावाही नसावा, एवढी प्रचंड साक्षेप शक्ति आणि गांभीर्य यांचे ठिकाणीं सहजच होतें. त्यामुळे अमुक एक प्रकारची माहिती त्यांना कधीं आगाऊच मिळाली नाहीं, अथवा अमुक एक काम करण्यास लायक मनुष्य जवळ नाही, अशी अडचण त्यांस कवींच भासली नाही. अर्थात् या सर्व मंडळींत बाजाखुणगेही असावयाचेच; परंतु त्यांतूनच माणसें काढून कामास लावावी अशी त्यांची रीत होती. प्रत्येक रविवारी मेडिकल कॉलेजांतील सर्व विद्यार्थ्यांस मोठी मेजवानी होत असे, आणि त्या वेळीं कांहीतरी नवें पक्कान्न करण्यांत येई; असा क्रम मुंबईस असेपर्यंत होता. या सर्व गोष्टींस अर्थातच पुष्कळ पैसा लागत असे, आणि जरी भाऊसाहेबांची श्रीमंती बरीच होती व श्रीअण्णासाहेबांच्या भावी उत्कर्षाची अतिशय मोठी कल्पना व खात्री त्यांना असल्यामुळे त्यांनी अगर त्यांच्यामागें नानासाहेबांनी कधीं नाही झटलें नाहीं, तरी देखील घरून येणारा पैसा पुरा पडत नव्हता, आणि त्यामुळे थोरल्या बाजीरावसाहेबांप्रमाणे कर्जाच्या भानगडींत हे तेव्हांपासूनच पडलेले होते. विद्यार्थी असतांच अपिलें लिहिणें वगैरे धंदे करून आपण पैसा मिळवीत असूं, असें त्यांनी एकदां स्वतः सांगितलें. 0 ठर- सामाजिक चळवळीपैकी विष्णुशास्त्री पंडितांनी नुकत्याच काढलेल्या विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीकडे त्यांचे बरेंच लक्ष वेधलें, आणि विष्णुशास्त्रयां- बरोबरच विधवा पुनर्विवाह शास्त्रोक्त आहे, अथवा निषिद्ध आहे, विण्याकरितां प्राचीन वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला. त्यावरून विधवांचा पुनर्विवाह करणें, अर्थात अविद्धयोनि विधवांचा पुनर्विवाह करणे, शास्त्रास सोडून नाहीं, अशी त्यांची खात्री झाली. त्यावरून कांही काळ विधवापुनर्विवा हाचे पुरस्कर्ते म्हणून पंडितांच्या जोडीने त्यांनी काम केलें. पतितपरावर्तना-