पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तत्कालीन सुधारक व अण्णासाहेब यांच्यांतील मतभेद. ३१ चाही प्रश्न त्यांच्या डोक्यांत घोळत होता. असें कांही तरी घडवून आणून हिंदु व मुसलमान या दोन समाजाचे एकीकरण व्हावें, असे त्यांस अतीशय चाटत असे. स्वभावतःच हे समाज परस्परांस इतके विरुद्ध आहेत की, अशा कांहीं तडजोडीशिवाय केवळ राजकीय अथवा सामाजिक वगैरे तत्त्वाकरितां दोघांचें एकीकरण होणें केवळ अशक्य आहे, असे त्यांनी ठरविलें होतें. याच्याच जोडीला, दुसऱ्याही किरकोळ सुधारणांस त्यांचा पाठिंबा होता. या सर्व गोष्टींमुळे व्हावयाचा तोच परिणाम झाला आणि पुष्कळ बाबतींत बापलेकांचे पटेनासें होऊन, एक प्रकारचा बहिष्कार त्यांचेवर घरांतून घाल- ण्यांत आला. परंतु कौटुंबिक गुणांपेक्षां सामाजिक व राष्ट्रीय गुणांचेच उत्तरो- त्तर महत्व त्यांचेजवळ असल्यामुळे, त्यांनी आपली मतें व उद्योगही सोडून दिले नाहीत, अथवा बेपर्वाईनें वडिलांचा अपमान करून घरही टाकून दिले नाहीं. मुकाट्यानें यावें, व बाजूस मांडलेल्या पानावर जेवून आपल्या कामास निघून जावें, असें घरीं असतां त्यांस कित्येक दिवस करावे लागले. या सर्वाचा असा अर्थ नाहीं, की सुधारक ह्मणून जो एक वर्ग त्यावेळी जोरांत येऊं पहात होता, त्यांच्याचपैकी अण्णासाहेब हे एक होते. त्या वर्गाच्या स्वाभिमानशून्यतेबद्दल आर्यराष्ट्र आर्यसंस्कृति व आर्यपरंपरा यांविषयींच्या पूर्ण अज्ञानाबद्दल, व अशाच प्रकारच्या अनेक अर्धवट कल्पना आणि चम- तत्कारिक तन्हा, यांचा त्यांस मनापासून तिटकारा होता; व पुढे पुढे तर सुधारणा म्हणजे सर्व इंद्रियसुखाचा अनिर्बंध मार्ग, अशी जेव्हां सुधारकांची स्थिति त्यांस दिसूं लागली, तेव्हां तर यांस त्यांचा इतका कंटाळा आला व नाना प्रकारच्या अनुभवांनी त्यांची कित्येक बाबतींत मतेंही इतकी पालटलीं कीं, अण्णासाहेबांनी रानडे व विष्णुशास्त्री पंडित यांच्या जोडीनें काम केलें आहे, असें कोणास सांगितल्यास तें त्याला खरें देखील वाटावयाचें नाहीं, इतका त्यांनी तो विषय सोडून दिला. सुधारकांशी यांचा पहिल्यापासूनच अतिशय विरोध म्हणजे, सुधारणेच्या नांवाखालीं आचारास वळण न देतां अजीबात फाटा देण्याचा उपक्रम आणि अबलोन्नति ह्या दोन विषयांत होता. स्वधर्माच्या सर्वोत्कृष्टतेबद्दल त्याची अढळ श्रद्धा होती, व त्याच्या पायावर उभारलेल्या सर्व तऱ्हेच्या परंपरांच्या उपयुक्ततेबद्दल कमालीचा अभिमान होता. कांही गैरसोय झाली तरी देखील ती सोसून त्या राखल्या पाहिजेत, आणि त्या सोडून .