पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ मुंबईतील बारा वर्षे. अथवा आमचें राष्ट्रीयत्वच पालटून, स्वातंत्र्य अथवा खाण्यापिण्याचें व कपड्या- लत्यांचे मुर्दाड वैभव केवढेही मिळाले तरी त्याची किंमत नाही, अशी त्यांची समजूत होती. काळाला उचित असे फारच थोडे फरक त्यांत केले पाहिजेत, एवढेच त्यांस वाटत असे. स्त्रियांस शिक्षण असले पाहिजे, असे त्यांचेंही मत होतें, परंतु शिक्षण ह्मणजे एकाद्या भाषेत अगर कांहीं कलांत प्राविण्य संपादणें व व्यक्तिस्वातं- त्र्याच्या नांवाखाली मोकाट वागणे, हा सुधारकी चळवळीचा निष्कर्ष त्यांस पटणें केव्हांही शक्य नव्हतें. जें इंग्रेजी शिक्षण व जी इंग्रेजी संस्कृति कांहीं ऐहिक गोष्टी सोडून जिवाच्या खऱ्या कर्तव्याच्या दृष्टीनें टाकाऊ आहे असे त्यांस वाटत होतें, व ज्याचा फोलपणा सिद्ध करून दाखविण्याचा त्यांचा उद्देश होता, तेंच शिक्षण स्त्रियांच्या माथी मारावें हें त्यांस अत्यंत आत्म- घातकीपणाचें वाटत असे. अण्णासाहेबांच्या व त्या वेळच्या इतर लोकांमध्ये हा एक मोठाच फरक होता की इंग्रज मनुष्य कोणचेंही काम करो, अथवा कसल्याही विषयास हात घालो, तो वरून कांहीही बोलला अगर कसाही वागला तरी पोटांतून हिंदुस्थानशीं असलेला त्याचा राजकीय संबंध, त्या संबंधाची त्यास व त्याच्या समाजास असलेली उपयुक्तता, आणि त्यामुळे तो दीर्घायु व दृढ होण्याची आवश्यकता व या सर्वांसंबंधी त्याचें कर्तव्य, या गोष्टी अजीबाद विसरू शकत नाहीं, व त्याला धरूनच तो सर्व करतो, हें त्यांच्या राजनीति- शास्त्राचे पहिले तत्त्व होतें. त्यामुळे सुधारणांच्या नांवाखालीं ज्या कित्येक चळवळींना इंग्रज अधिकारी व इंग्रज लोक उचलून धरीत, त्यांच्यांत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असें कांहीं तरी राजकीय धोरण त्यांना दिसून येई. विधवापुनर्विवाहाच्या चळवळीबरोबरच इंदुप्रकाशच्या लेखकाचेंही काम पंडितांच्याबरोबर अण्णासाहेब करूं लागले. या पूर्वीही लेखनकलेचा उपयोग त्यांनी थोडाबहुत केला असावा. स्वातंत्र्यावरील त्यांचा “ The tree of liberty is watered by the blood of patriot's heart " या वाक्याने सुरू होणारा निबंध वाचून महादेव गोविंद रानड्यांची लेखकास छातीशी कवटाळून धरावें अशी स्थिति होऊन गेल्याचे सांगतात. पुण्याच्याही कांही पत्रांतून मधून मंधून ते लिहित असत, परंतु जास्त संबंध असा इंदुप्र- काशाशींच होता. याच्याच जोडीस औद्योगिक चळवळ म्हणून कांही लोकांच्या