पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विष्णुशास्त्री पंडितांशीं बेबनाव. ३३ सहाय्याने कांचेचा कारखानाही त्यांनी सुरू केला होता. रानड्यांच्या प्रार्थना- समाजाशी त्यांचा संबंध कधीच नव्हता; परंतु कर्नल ऑलकॉट व मॅडेम ब्लॅव्हाट्स्की यांची नवी टूम काय आहे हे पाहण्याकरितां ते थिऑसफीत शिरले होते, व बाईंच्या विनंतीवरून सोसायटीच्या वतीनें कांही लिहिण्याचे कामही त्यांनी केले. याशिवाय अनेक लहान मोठी कामे सुरू केल्याचा नुसता उल्लेख त्यांच्या भाषणांत येई; परंतु त्यांविषयी सविस्तर माहिती अशी त्यांनी केव्हांही दिली नाहीं. अशा रीतीनें जडलेला रानड्यांना व त्यांचा संबंध जर टिकला असता तर त्यापासून देशाला केवढा फायदा झाला असता, हें कांही सांगतां येत नाही; परंतु रानड्यांचा भित्रेपणा त्यांस आवडत नसे. तरीही रानड्यांची विद्वान् या दृष्टीने योग्यता अण्णासाहेब जाणून होते, म्हणून सरकारी नौकरीचा अढथळा मध्ये येईपर्यंत दोघांत कधी फाटलें नाहीं. विष्णुशास्त्री पंडितांशी फाटण्यासही असेच कारण झाले पंडितांचें पहिले कुटुंब वारल्यावर व कोणच्याही कारणानें कां असेना, आपण एका गतभर्तृकेशी पुनर्विवाह करावा, असे त्यांच्या मनाने घेतलें. या गोष्टीस अण्णासाहेब अतिशय विरुद्ध होते. त्यांचें स्पष्ट असे मत होतें कीं, हा विवाह पंडीत हे तत्त्वाकरितां करीत नसून इंद्रियसुखाकरितां करीत आहेत. स्वतः विधुरावस्थेतच राहून त्या गतभर्तृकेचा विवाह दुसऱ्या एकाद्या तरुणाशी अथवा काम पडल्यास स्वतःच्या चिरंजीवाशी लावून तत्वदृष्टया पंडितांस खरें कर्तव्य करितां येईल, असे त्याचें मत होतें; 'मुलाचा पुनर्विवाह लावून स्वतः संन्यास ध्या व पुनर्विवाहप्रचारक व्हा; ' असे त्याचें सांगणें होतें. या विषयावर प्रचंड भवति न भवति झाली, सबंध एक रात्र आपण पंडितांचे डोके धरून बसलों, व त्यांस परोपरीनें विनविलें, आणि तरी ही जेव्हां ते ऐकेनात, तेव्हां सुधारक लोक आणि त्यांची इंद्रियपरायणता यांचा तिटकारा येऊन आपण पंडितांस रामराम ठोकला, अर्से अण्णासाहेब सांगत. पंडितांस त्यांनी पुनर्विवाहाच्या काम चांगलीच मदत केली होती; आणि ज्यावेळी पुण्यास शंकराचार्यांच्या समोर या प्रकरणी वाद झाला, त्यावेळी पंडितांचे साथीदार म्हणून उघड उघड बसून त्यांस ग्रंथांतून आधार काढून देण्याचे काम अण्णासाहेब करीत होते. त्यामुळे पंडितांचें वर्तन त्यांस लागणें साहजिक होतें; आणि पुढे तर जास्त विचाराअंती ३