पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ मुंबईतील बारा वर्षे. व अवलोकनानें शास्त्रविरुद्ध नसला तरी पुनर्विवाह करूं नये, असेच त्यांचं मत झाले. असो. मेडिकल कॉलेजमध्ये असतांना एक दिवस एका प्रोफेसरानें एडिनबर्गच्या मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चालविलेलें मेडिकल जर्नल दाखवून अशी टीका केली की, " See, how students at home work. " या टीकेचा अण्णासाहेब यांस अतिशय विषाद वाटला, आणि प्रोफेसरास फजीत करावयाचें असा त्यांनी तेथल्या तेथेंच निश्चय केला. त्या दिवश इ. स. १८७४ च्या मार्च महिन्याची ४ तारीख होती. कोणासही न सांगतां मुकाट्यानें तयारी करून, त्याच मासिकाच्या आकाराचा, जाहिराती नसलेला परंतु तसलाच भरपूर मजकूर आंत असलेला Grut Medical College न्चा पहिला अंक त्यांनी स्वतः लिहून काढला, व छाप- Journal वून एप्रिल महिन्याच्या चवथ्या तारखेस ह्मणजे प्रोफेसर साहेबांनी टीका केली तेथून नक्की एक महिन्यानेंच, त्यांच्या हातांत ठेवला ! आणि वर त्यांस बजावलें कीं, " See how students here work, if help is given to them" ते पाहून प्रो. मजकूर तर थक्कच झाले, व इतर प्रोफे- सरांची यांच्यावर मर्जी बसली. त्यांतीलच डॉ. स्मिथ यांचा व अण्णासाहेबांचा अतिशय लोभ जडून महत्त्वाच्या गोष्टी पुढे घडून आल्या. Grant Me- dical College Journal चे २१३ अंक निघाल्यावर त्यास जाहिरातीही चांगल्या मिळू लागल्या, आणि खर्चाच्या दृष्टीनें तें काम झेंपैसें झालें. या पुस्तकांत मन घालून ते त्यांनी चांगल्या स्वरूपास आणलें, आणि पुढे पुढे तर निर निराळ्या भाषांतील वैद्यकविषयक ग्रंथ, पत्रे आणि मासिके यांचे सदर काढल्यामुळे, मासिकास फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, वगैरे देशांतील पर्ने आणि मासिकें भेट देऊं लागलीं, व परीक्षणाकरितां ग्रंथ येऊं लागले, आणि त्याचें महत्व फारच वाढलें. निरनिराळ्या भाषेतील मजकुरांचें परीक्षण करतांना एक दोन युरोपिअन स्नेह्यांची मदत फार झाली, म्हणून ते सांगत असत. अण्णा- साहेबांस स्वतःस १०-१२ भाषांचा त्यांच्या शब्दांत बोलावयाचें ह्मणजे कामापुरता " - अभ्यास होता; व त्या भाषांतील उपयोगी पडणारे सरासरी ९-१० शें शब्द आपण प्रत्येकी पाठ केले होते, असे ते सांगत. अशी कांही स्वतःची तयारी व कांहीं स्नेह्यांची मदत, यांनी ते काम त्यांनी यशस्वी करून 66 "