पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेडिकल कॉलेज जर्नल, कुंट्यांशीं वितुष्ट. ३५ दाखविलें. मासिकास आलेली सर्वांत मोठी भेट ह्मणजे व्हिक्टोरिया राणी साहेबांचे खासगी सर्जन यांनी लिहिलेले सर्पशास्त्रावरील ( Ophiology ) मोठें प्रचंड पुस्तक होय. हे पुस्तक जवळ जवळ ६०० रु. किंमतीचे होतें। मासिकाच्या लौकिकावरून ते परीक्षणाकरितां ह्मणून आले होतें. जर ग्रंथ- कर्त्यास मासिक चालविणारे केवळ Medical College चे विद्यार्थी आहेत, असें ठाऊक झाले असेल तर त्यांस केवढा आचंबा वाटला असेल, त्याची कल्पनाच केली पाहिजे. मासिकाकरितां जाहिराती मिळवाव्या असे ठरल्यावर अशी गोष्ट झाली कीं, अण्णासाहेब हे Kemp & Co च्या एजंटास भेटावयास गेले. त्या- चेळीं दुपारचे बारा वाजले असून तो साहेब खाना खावयास बसत होता. तेथेंच त्यानें यांना बोलाविलें. परंतु अण्णासाहेब जवळ जातात तोंच, या . काळ्या मनुष्याने आपल्या खान्याच्या टेबलास शिवणें ठीक नाहीं असे वाटून, त्यानें मगरूरीनें त्यांस दूर उभे राहावयास सांगितलें. त्या वेळीं तळपायाची आग मस्तकास जाऊन “ All right, good day " असे म्हणून अण्णा- साहेबांनी पाठ फिरविली. चार सहा महिन्यांनी असा प्रसंग आला की तोच एजंट अण्णासाहेबांकडे येऊन, त्यानें आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी प्रदर्शित केली, आणि 'कंपनीच्या जाहिगती तुम्ही घ्या,' म्हणून अजाजी करूं लागला ! याच्यानंतर पुढें लौकरच. या सर्वांचें मूळ जे अण्णा मोरेश्वर त्यांचें व अण्णासाहेबांचे एका प्रोफेसरला मानपत्र देण्याच्या संबंधांत वितुष्ट आलें, आणि तेव्हांपासून ते उभयतांही एकमेकांचे पक्के हाडवैरी बनले. असे सांगतात कीं, पुढ़ें पुण्यास असतां अण्णा मोरेश्वर यांस एक अतीशय जिवावरचा आजार झाला, व त्यांतून ते निभावतील, अशी आशा आप्तेष्टांस वाटेना. अशा स्थितीत कोणी एकानें अण्णासाहेबांस आणावें म्हणून सुचविलें. स्वतः अण्णा मोरेश्वर हे बेशुद्ध असल्यामुळे त्यांस विचारण्याची सोय नव्हता; आणि त्यांचे अण्णासाहेबाशी असलेलें हाडवैर तर प्रसिद्ध होतें. परंतु अण्णासाहेबांच्या औदार्याची माहिती असल्यामुळे कांही लोकांनी त्यांस तेथें नेण्याचा हिय्या केला. परीक्षा केल्यावर अण्णासाहेबांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलें, व औषध दिल्यावर होणारी कांही लक्षणे सांगून २ तास पहारा करा- यास सांगितलें. २ तासांनंतर जेव्हां मंडळीनी रिपोर्ट दिला तेव्हां 'आतां कुंटे