पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. वांचले, काळजी करूं नका' असे म्हणून अण्णासाहेब स्वतः झोपी गेले. कांही वेळानंतर कुंटे सावध झाले, व आपल्या स्थितीत पडलेला फरक पाहून त्यांस राग आला, व 'मी मेलो असतो तरी हरकत नव्हती, पण विनायक रामचंद्रास कां आणले ? त्याच्याशिवाय दुसरा कोणी असें औषध देणें शक्यच नाही. तुम्ही पटवर्धनास आणलें खास,' असे म्हणूं लागले ! यावरून अण्णासाहेबांचें वैद्यक कौशल्य तर दिसून येतेंच, पण त्यांच्याविषयी कुंठ्यांच्या मनांत असलेला तीव्र द्वेष आणि त्यांच्या खन्या योग्यतेची पूर्ण जाणीव, ह्रींही दिसून येतात... वर डॉक्तर स्मिथ याचें नांव आले आहे. अण्णासाहेबांच्या वैद्यकीय नैपुण्यावर त्याचा अतीशय भरंवसा असे. त्याची स्वतःची खाजगी Practice पुष्कळच म्हणजे २१३ हजारपर्यंत असे, व त्याचा लौकी- कही चांगला होता. त्यास स्वतःस कोणत्याही प्रसंगी जरा अडलें अगर शंका आली, तर तो अण्णासाहेबांस बरोबर घेऊन जात असे, आणि हा विद्यार्थी व आपण गुरु वगैरे भाव न धरितां त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागत असे. अशाच एका प्रसंगी आर्यवैद्यकाचें श्रेष्ठत्व साहेबांचे नजरेस आणून देतांना, दोन्ही वैद्यकांचा तुलनात्मक अभ्यास करावा, अशी त्यांच्या डोक्यांत कल्पना आली. वाघानें केलेल्या जखमांचे विषावर, आंग्लवैद्यकांत कसलीच चिकित्सा नाही, परंतु त्या विषावर आपलेकडे औषधे असून त्यांच्या योगानें. डॉ० स्मिथ यांस एक रोगी अण्णासाहेबांनी बरा करून दाखविला. यावरूनच या दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करीत असतांना, आंग्ल वैद्यकाच्या. कित्येक उणीवा त्यांच्या लक्षांत आल्या; व तें सिद्ध करून दाखविण्याकरितां म्हणून त्यांनी मोठीच खटपट केली. इंग्रजी मासिक त्यांच्या हातींच होतें; त्याच्या जोडीस 'वैद्यसुधा' म्हणून आर्यवैद्यकाची माहिती देणारें मासिक त्यांनी सुरू केलें, आणि त्यांच्या जोडीस प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याकरितां एक इंग्रजी दवाखाना आणि एक देशी दवाखाना सुरू केला व त्यांवर स्वतः देख- रेख ठेवून काम चालविलें. यांतील मुख्य खुबी अशी होती कीं, एकाच रो- गाच्या कांही रोग्यांस आंग्ल पद्धतीने व कांहींना देशी पद्धतीने औषध देऊन त्यांचे बरें होण्याचें व बरें होण्याच्या वेळांचें शेकडा प्रमाण पहावयाचें. देशी दवाखाना पुण्याचे लागवणकरशास्त्री चालवीत असत, व इंग्रजी दवाखान्यावर डॉ० भाऊ गोपाळ मंत्री म्हणून एक सारस्वत गृहस्थ काम करीत होते.