पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ आर्यवैद्यकविषयक कामगिरी. दोन्हीही दवाखान्यांनी कांहीं काळ उत्तम काम केलें, व पुढे जर सालरजंग अकरण उपस्थित झाले नसतें, तर मोठ्या संस्थांच्या स्वरूपास ते आले असते. हा तुलनात्मक अभ्यास पुरा व्हावा म्हणून २४ लाख रुपये उभारून एक मोठी संस्था स्थापन करावी, आणि मिळतील तेथून आर्यवैद्यकावरील ग्रंथ धुंडून आणून प्रसिद्ध करावे, व अशा रीतीनें तुलनात्मक दृष्टानें आर्यवैद्यकाचें श्रेष्ठत्व दाखवून, त्यांतील व्यंगें दूर करावी, असा त्यांनी उपक्रम केला, परंतु त्यांच्या इतर सर्व उद्योगांबरोबरच त्यांच्या मद्रासेस जाण्यामुळे, त्याची इतिश्री झाली. अण्णासाहेब मुंबईस आल्यानंतर थोड्याच दिवसांनी फ्रँको-जर्मन युद्ध होऊन जर्मनी सर्व तऱ्हेनें पुढे सरसावला. या युद्धाकडे त्यांचें विशेष लक्ष लागलें होतें, व त्याचा त्यांनी बारकाईनें अभ्यास केला होता. देशांतील सर्व त-हेच्या चळवळींबरोबरच परदेशांतही चळवळ झाली पाहिजे, व परराष्ट्रांत संधानें असल्याखेरीज असल्या चळवळी निभत नाहीत, असे त्यांनी पाहून ठेवलें होतें. याच वेळीं इटली स्वातंत्र्याकरितां धडपडत होता, अमेरिकेंत गुलामांच्या वादावरून भयंकर यादवी झाली होती, आणि शोगन गिरीतून मोळका होऊन जपान उन्नतीच्या मार्गास लागला होता. हिंदी राजकारणाचा विचार केवळ हिंदु लोकांवरूनच न करतां, राजकर्त्यांची एकंदर राजनीति आणि जगांत सर्वत्र होत असलेल्या या उलाढाल्या यांवरूनही केला पाहिजे, असे त्यांचें मत होतें. कांच कारखान्यांत त्यांना अपयश आले, त्यावरून व त्यांच्या इतर अनुभवांवरून त्यांनी असें लौकरच ओळखिले की, सत्ताधान्यांशी टक्कर खेळतांना कशाही स्वरूपाची कां होईना, पण सत्ताच जवळ असली पाहिजे. आणि एकादा स्वतंत्र प्रांतच आपल्या ताब्यांत असण्याची त्यांना गरज भासूं लागली. तेव्हां अर्थातच पहिली कल्पना एकाद्या संस्थानिकाश धोरण बांधून तें हाती घ्यावयाचें; व या कल्पनेप्रमाणे हैद्राबाद, इंदूर, बडोदा यांच्यासारख्या मोठ्या, व वढवाण लिमडी वगैरेसारख्या छोट्या, संस्थानांत आपले वजन बसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, व तो किती उत्तम साधला, हैं हैद्राबादचे प्रकरण, वकिलीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना सांगून आलेली बडोद्याची दिवाणगिरी, तुकोजीराव होळकर यांच्या मुलाखती वगैरे प्रसंगा- वरून दिसून येतें. या अंतर्गत प्रयत्नांबरोबरच निरनिराळ्या देशांतील कॉन्स- त्यावरूनच