पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ मुंबईतील बारा वर्षे.. लांच्या ओळखी करणे, त्यांच्याशी हिंदी राजकारणाविषयीं चर्चा करणें, व जरूर पडल्यास सहाय्य मिळविण्याची संधानें बांधणें, वगैरे कामेही सुरूंच होतीं. या सर्व प्रकरणांचा अर्थातच रानडे प्रभृति मंडळीस गंधही नसे. इतकेच तर काय, परंतु त्यांचे बैठकींत अखंड असणाऱ्या लोकांनाही त्यांच्या एकंदर व्यापाची कल्पना नव्हती. परंतु अशा प्रकारची संधानें बांधीत असतांही, त्या परकी लोकांवर विश्वास ठेवून उगीच कांहीं तरी मात्र त्यांनीं कधीं केले नाही. मुंबईस रशियन प्रिन्स आला होता, त्यावेळेस अण्णासाहेब यांस त्यांच्या रशियन भाषेच्या तात्पुरत्याच कां होईना पण जाणतेपणामुळे पुढे केलें होतें, अर्से सांगतात. या गोष्टीचा फायदा घेऊन आपण लष्करी जहाज कसें असतें तें स्वतः जहाजावर जाऊन पाहिल्याचें तें सांगत असत. टारपेडो व बांबशेल्स यांच्या प्राथमिक अवस्था आपण तेथे पाहिल्या, म्हणून ते सांगत. अशाच प्रकारें समुद्रांत तार टाकण्याकरितां आलेल्या इंग्रजी लढाऊ जहाजावर आपण अमेरिकन कॉन्सलशी संधान बांधून गेल्याचें व येतांना तेथून तांरचा एक तुकडा घेऊन आल्याचे ते सांगत असत. या सर्व गोष्टींमुळे त्यांची एक मात्र खाली झाली की, झाडाखाली झाड वाढणें केव्हांही शक्य नाहीं; आणि प्रजेच्या प्रकृतीचें अत्यंत सूक्ष्म ज्ञान असणाऱ्या व स्वतःची नीतितत्त्वें किंचित् देखील हयगय न करतां, अथवा कसल्याही विकारांना वश न हातां पाळण्याविषयों डोळ्यांत तेल घालून जपणाऱ्या इंग्रज सरकारास, राज्यक्रांतीचे डाव खेळून फसविणे शक्य नाहीं. जर हिंदुस्थानचा कांहीं तरणोपाय असेल तर, जगाच्या एकंदर राष्ट्रीय उलाढालींत ज्या वेळेस हिंदुस्थान व इंग्लिश राष्ट्र हीं दोन्हीही सांपडतील, त्यावेळी तो निघणे शक्य आहे. तोपर्यंत औद्योगिक, सामाजिक, धार्मिक, वगैरे कित्येक चळवळीं परंपरा बुडून जाऊं नयेत म्हणून, व त्या कसाबसा तरी जीव धरून रहाव्या म्हणूनच करावयाच्या. म्हणून पुढे पुढें या सर्व गोष्टींवरच भर टाकून देऊन, जेणेकरून अशा रीतीने असा कांहीं तरी पर- राष्ट्रीय गोंधळ हिंदी राजकारणांत घालतां येईल, व जेणेकरून एकाद्या परकी रा- ष्ट्राला हिंदुस्थानच्या अंतर्गत व्यवस्थेत हात शिरकवितां येईल, परंतु त्याचा फायदा आपणा स्वतःला करून घेतां येईल, असे कांहीतरी करण्याकडे त्यांचें लक्ष लागलें. हिंदुस्थान सरकार व त्यांची एतद्देशीय दोस्त आणि मांडलिक संस्थाने यांच्या परस्परसंबंधाचे व राजकारणाच्या इतिहासाचें जें सूक्ष्म व गाढ ज्ञान त्यांनी