पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील वारा वर्षे. कांदातील कारवायांची तवें व धोरणें नीट ओळखून नवा गव्हर्नर तें लोण बिनचुक पुढे कसें नेतो, हे आपण या गिब्जच्या जवळील पुस्तकावरूनच शिकलों, असें ते सांगत. ४० इतर अनेक उद्योगांतच, देशी कारखान्यांचे उत्तेजनार्थ प्रदर्शन भरविण्याची कल्पना काढून त्यांनी ती प्रत्यक्षांतही आणली. अर्थातच ही कल्पना केवळ त्यांची एकट्याची नसेल; परंतु ज्यांनी ती काढली व घडवून आणली, त्यांपैकी ते एक प्रमुख होते. त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला कांचकारखाना हा एका स्वीडिश माणसाच्या देखरेखेखालीं चालला होता, व त्याच्या कुशलतेमुळे आणि इमानी- पणामुळे तो लौकरच अतिशय भरभराटीस येईल, असे वाटू लागले होतें. कांचेचा कारखाना चालू असतांच त्यांतल्याच द्रव्यांवर सल्फ्युरिक अॅसिड व क्रमाक्रमानें इतरही रासायनिक पदार्थ अत्यंत अल्प श्रमांत व खर्चात काढावे, अशी योजना केली होती. सल्फ्युरिक अॅसिडचा प्रयोग तर इतका उत्तम झाला की, केंपसारख्या कंपनीकडून चौदा आण्यास मिळणारी वाटली अवघ्या दोन आण्यांत येऊं लागली! तेव्हां इंग्रेजी व्यापारी मंडळांत मोठीच खळवळ उडून गेली. कांचेच्या कारखान्यास मीठ, सोडा वगैरे पदार्थ लागतात, व त्यावेळी मिठावरचा कर नसल्यामुळे समुद्राच्या मुबलक पाण्यावर हा कारखाना हवा तेवढा यशस्वी होण्याचा भरंवसा होता. परंतु इंग्रेजी व्यापारी मंडळाच्या कल- कलाटाचा व पूर्वीपासूनच सरकारच्या धोरणांत असलेल्या मिठावरील कराच्या कल्पनेचा मेळ पडून, लागलीच त्या कल्पनेला कायद्याचें स्वरूप आलें; त्यामुळे पूर्वीची घडी बिघडून जाऊन सल्फ्युरिक अॅसिड वगैरे पदार्थांची जोड नाहीशी झाली, व कांच माफक किंमतीत देणें परवडेना; तरीही तो त्यांनी नेटाने पुढे चालविला असता; पण कांहीं कारणानें त्या स्वीडिश मनुष्यास परत जावें लागले, आणि त्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागला. मुंबईत सूत काढण्याच्या व कापड तयार करण्याच्या गिरण्या घालण्याची त्यावेळी व्यापारी मंडळांत एक लाट उठली होती. अशा तऱ्हेच्या धंद्यासंबंधाने अण्णासाहेबांचे अनुकूल मत कर्धीच नव्हतें. स्वीडिश मनुष्यावर अवलंबून असणारा कारखाना केव्हां वुडेल याचा जसा नाही, तसेंच, परदेशांतून येणाऱ्या यंत्रांवर अवलंबून राहणारे कारखाने केव्हां बुडतील अथवा टाकाऊ ठरतील याचा नेम नाहीं; म्हणून मोठमोठ्या लोकांनीं, मोठ्या प्रमाणांत कारखाना न