पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गिरण्यांविषय अण्णासाहेबांचे मत. ४१ 'निघाला तरी चालेल, पण कारखान्याबरोबरच त्यांची यंत्रसामुग्रीही येथेंच तयार करण्याचा उद्योग केला पाहिजे, असे त्यावे ठाम मत होतें. एवव्या- साठी यंत्रसामुग्रीच तयार करण्याचे कारखाने काढावे, असा त्यांनी प्रयत्न केला. परंतु थोड्या खर्चात यंत्रसामुग्री पदरांत पडून कापसाच्या वाढत्या व्यापारावर गवर होण्याच्या लालसेमुळे इतक्या खोलांत जाण्याची व्यापारी वर्गास गरज वाटली नाहीं, आणि त्यामुळे ही उत्कृष्ट कल्पना मार्गे पडली. या सर्व गोष्टींमुळेच एकादा प्रांत आपल्या हाती असावा, असेच त्यांना जास्त वाहूं लागले. निवळ संस्थानिकांस हाती धरून काम रेटणार नाही, अशी समजूत झाली, व त्यामुळेच हैद्राबादच्या प्रकरणावर त्यांचा अतिशय भर पडला. या प्रकरणाची मनोरंजक हकीकत पुढे स्वतंत्र प्रकरणांत द्यावयाची आहे, म्हणून तो भाग सोडून दुसऱ्या कित्येक ठळक गोष्ट येथें सांगू मेडिकल कॉलेजांतील अभ्यासक्रमापेक्षां LL.B. चा अभ्यासक्रम थोड्या वर्षांचा असल्यामुळे हे ताबडतोय वकील व्हावयाचे. परंतु तसें होण्यास व्यांस ८ वर्षे लागली. मात्र इतक्या खटाटोपांनी पास होण्यापुरता अभ्यास करतां आला नाही म्हणून नव्हे, तर उलट त्यांनी 1. M & S. व L.L. B. प्रमाणेच L.C. E. ची टर्म भरावी असा त्या कॉलेजचे प्रिन्सिपाल ग्रँट साहेब यांचा आग्रह पडल्यावरून, व तसे केल्यास कांहीं विषयांची सूट देऊं म्हणून त्यांनी कबूल केल्यावरून, ते कॉलेजही त्यांनी धरले होते. अभ्यासाची त्यांस मोठीशी प्रतिष्ठा होती असें नाहीं, पण सबंध मुंबईच्या उठाठेवी करतां करतां नेमानें अभ्यास करणे शक्य नव्हतें हैं तर उघडच आहे. परंतु त्यांतल्यात्यांत कांहीं वेळ काढून, कोर्डे रस्त्यांनीं जातांना, कोठें, दुसन्यांशी बोलत असतां, कोठें दुसऱ्यानें वाचलेले ऐकून व केव्हां त्याच्याच मार्गे नेटाने बसून, ते आपले काम भागवून घेत होते. बहुतकरून अभ्यास करण्याचा प्रसंग रात्रीस याव- याचा; आणि अभ्यास सारा उभ्या उभ्या व्हावयाचा ! खोलींतील सर्व भिंतींस भरपूर उजेडाचे दिवे लावून हातांत पुस्तक घेऊन पिंज-यांतील सिंहाप्रमाणे फेन्या करीत अभ्यास करावयाचा असा बहुतेक क्रम असे त्यावेळी यांस करमणुकीकरितां कांहीं तरी खावयास लागे, म्हणून भिंतीच्या कोनाड्यांतून चांदीच्या बशांतून यांचे आवडते पदार्थ, - म्हणजे पाकाच्या चिरोठ्या, श्रीखंड वगैरे गोड व कांहीं तिखट पदार्थ भरून ठेवलेले असत. हिंडतां हिंडतां मधेंच