पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. एकादा तुकडा तोंडांत टाकावा, अगर चमचा घ्यावा, व पुढे वाचूं लागावें, असा खेळत खेळत अभ्यास व्हावयाचा. परंतु कित्येक वेळां अर्से होई की, काम फार शिल्लक राहिले म्हणजे जेठा मारून तासचे तास बसावें, व पाणी पिण्या- सही मान वर न करतां काम संपवून उठावें ! चार चार दिवसांत जमीनीस पाठ लावली नसल्यामुळे व कमालीच्या दगदगीमुळे, अशा वेळी पाठ दुखूं लागे, व मंडळीनी ऊन पाण्याच्या बोळ्यांनी एकीकडे पाठ शेकावी, व एकीकडे यांनी आपला पाठ वाचावा असे पुष्कळ वेळां होई ! एकदां तर पुरे बहात्तर तास आपण चाळीच्या खिडकीशीं वाचीत बसलों होतों, म्हणून त्यांनी सांगितलें !! त्या वेळचा अनुभव सांगतांनाही त्यांना मोठी मौज वाटली. ते म्हणत, "दिवस उजाडला म्हणजे हळू हळूं खट खुट सुरू होऊन क्रमाक्रमानें अनेक तऱ्हेच्या ध्वनींचा मोठा कलकलाट दिवसभर चाले, व सायंकाळ झाली म्हणजे त्याच क्रमानें ध्वनी शांत होऊन कांहीं तासपर्यंत अगदी निस्तब्धता होऊन जात असे. रोज ठराविक वेळेस समोर सूर्याचा उदय व्हावा, व क्रमाक्रमानें त्याला बाढतांना पाहून, व नानात-हेच्या कलकलाटांची अभ्यासांत लक्ष गुंतल्यामुळे अस्फुट संवेदना होऊन त्या तंद्रीतही मौज वाटे, आणि जणूं कांही सर्व विश्वाच्या बाहेर बसून कौतुकानें त्याकडे पहावें असें होऊन, मनुष्यांचे नित्य व्यवहार आपल्या खुराड्यांत राहणाऱ्या पक्षांदिकांप्रमाणे भासत. असो. अभ्यासाची जरी तक्रार नव्हती, तरी यांचा जन्मगुणच असा होता की प्रत्येक बाबतीत कांहीतरी कटकट व्हावी, आणि दांडगाई करून पार पडावें. तसेंच परीक्षेच्या बाबतींतही झालें. विश्वनाथ नारायण मंडलीक ह्मणजे त्यावेळचे फारच जार्डे प्रस्थ होतें. परंतु कितीही मोठा मनुष्य असला तरी एखादे वेळेस तरी विकारवश होणारच. त्यावेळच्या एका प्रकरणांतील सरकारी धोरणावर कडक टीका असलेला एक लेख अण्णासाहेबांनी लिहिला. तो मंडलिक यांच्या नेटिव्ह ओपिनियन मध्ये प्रसिद्ध व्हावयाचा होता. मंडलीक है अतीशय सरळ व बाणेदार असल्यामुळे त्या लेखास हरकत करणार नाहीत अर्से यास वाटले, परंतु कोणच्याही कारणानें कां असेना तो प्रसिद्ध करा- चयाचें मंडलीक यांनी नाकारले व त्यावरून त्यांचा व अण्णासाहेबांचा मोठाच वाद झाला. “ लेखांतील विधानांची जबाबदारी पूर्णपणे माझ्याच शिरावर राहील, आपण भिऊं नका, ” असें परोपरीने सांगूनही ज्या वेळेस 33 ४२