पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंडलीकांबरोबर बाणेदार झगडा. ४३ निराशा झाली, तेव्हां अण्णासाहेबांस त्वेष आला व उभयतांची कांहीतरी कमीजास्त भाषा होऊन, मंडलिकांनी आपण L L. B. च्या परीक्षेत एका विषयांत परीक्षक असल्याची त्यांना आठवण दिली, व तुमच्या अधिक- पणाचें उहें काहूं म्हणून धाक घातला. त्यावर अण्णासाहेबांनीही तेथल्या तेथेंच त्यांस बजाविलें कीं, “कांही हरकत नाही, आपण मात्र सत्यास स्मरून पेपर तपासा, मग वाटेल तितका कडकपणा केला तरी हरकत नाहीं; मी आपल्याच हातून LL. B पास होईन, नाही तर मुळीं वकील होणारच नाही. " आणि हा दंश मनांत ठेवून मंडलिकांनी काम केल्यामुळे यांस ६ वर्षे लागली. प्रत्येक वर्षी त्यांच्या विषयांत नापास झाल्यावर मंडलिकांनी यांस आठवण द्यावी, व यांनीही ' मी तुमच्याच हातून पास होईन, तरच नांवाचा ब्राह्मण, अर्से पुनः पुन्हा बजावावें, असें पांच वेळां झालें ! सरतेशेवटी मंडलिकांस काम सोडण्याची वेळ आली व त्यांचे एकच वर्ष राहिले. यावर्षी अण्णासाहेबांनी तयारीही चांगलीच केली होती, व पुण्यात श्रीमहाराजांनी त्यांस “ या वेळीं हातावर हात मारून पास व्हावयाचें, बरें कां दादा !" म्हणून सांगितले होतें. त्याचप्रमाणे अखेरीस झाले. मोठ्याचें सगळेच मोठें, त्याप्रमाणे जसा द्वेष, तसा मनाचा थोरपणाही मंडलिकांचा मोठा होता, व कितीही कडकपणा केला तरी पेपरांत एकही चूक आढळून न आल्यामुळे, त्यांस हा विद्यार्थी पास करणे भाग पडले. या गोष्टीचा त्यांच्याही मनावर परिणाम झाला, व त्यांनी • This time I could not but pass you,' असे अण्णासाहेबांस • उघड बोलूनही दाखविलें. अशा रीतीनें हा सहा वर्षांचा बाणेदार झगडा संपला; व मंडलीकहो रिटायर झाले. वादाचा मूळ विषय जो अण्णासाहेबांचा लेख, तो पुढे लागलीच एका अँग्लो इंडियन पन्नानें प्रसिद्ध केला, व त्यामुळे तर मंडलिकांस जास्तच राग आला, असे अण्णासाहेब सांगत. याच सुमारास E M. S. चीही परीक्षा पास झाली, व दोन्ही पदव्या त्यांच्या गळ्यांत पडावयाच्या, परंतु येथेही पुन्हां एक कटकट उत्पन्न झाली. व त्यामुळे L. M.S. ची पदवी अशी त्यांना मिळवितां आली नाहीं. मेडिकल कॉलेजचे प्रि. डॉ. इंटरसाहेब हे विलायतेस गेले असतांना अॅट मेडिकल जर्नल त्यांनी लिहिलेल्या एका लेखावर 'त्यांतील विधानें असंबद्ध आहेत,' म्हणून अण्णासाहेबांनी टीका केली. हा लेख मधून ,