पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. 66 हंटरसाहेबांच्या वाचण्यांत येऊन त्यांच्या नाकास मिरच्या लागल्या; व हिंदु- स्थानांत परत आल्यावर माझाच विद्यार्थी असून मलाच फजीत करतोस ••काय ? आपली विधानें परत घे, " म्हणून त्यांनी अण्णासाहेबांच्या मार्गे लकडा लावला. " ही विधानें आपलीं आहेत हे माहीत नव्हते, म्हणून आपण टीका केली, परंतु काही झाले तरी ती टीका खरी आहे, म्हणून आपण परत घेणार नाही, होत असल्यास खोडून काढावीं, " असें या शिष्यानें गुरूंस बजा- "बलें ! तेव्हां यांचे नुकसान करण्याकरितां, एकाच वेळीं एक मनुष्य दोन परी- ●क्षांस बसणे योग्य नाही, असा त्यांनी सिंडिकेटमध्ये वाद काढला, व तशाच अर्थाचा कांही ठराव सिंडिकेटनें पास केला. त्यामुळे अण्णासाहेब यांस कोणती तरी एक डिग्री घ्यावी व दुसरीकरितां पुन्हा प्रयत्न करावा, अशी स्थिति प्राप्त झाली. त्यावर अण्णासाहेबांनी कोणची डिग्री घ्यावी असा प्रश्न आपल्या वडि- लांस केला असतां, भाऊसाहेबांनी वकील होण्यास सांगितले. कारण वैद्यकीवर पैसा मिळविणे, अयोग्य आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. वकीलीवर पैसा मिळवावा, वैद्यकीचा पैसा घेऊं नये, ही त्यांची आज्ञा अण्णासाहेबांनी पुढे इतक्या कड कपणाने पाळली की, वैद्यकीच्या सल्याकरितां आलेल्या इसमांनी आणलेले एकादें साधें फळ देखील ते कधीं घेत नसत, इतकेच नव्हे तर आपल्या घरांत देखील तें न राहूं देतां ओंकारेश्वरी वाटण्याकरितां पाठवून देत असत ! हायकोर्ट वकील झाल्यावर अण्णासाहेबांचा थाट तर विशेषच असे. इंग्रजी पोषाकाचा त्यांना तिटकारा असल्यामुळे त्यांनी अत्यंत नाखुषीनें हायकोर्टात `जाण्यापुरताच त्याचा उपयोग करावा. चांदीचे पेलेदार बिल्ले असलेले दोन पट्टे- वाले व कारकून वगैरे बरोबर घेऊन ते थाटानें कोटीत जात, व त्यांच्या एकंदर धोरणाला तें आवश्यकही होतें. परंतु एकदां घरीं आले म्हणजे पुन्हां नेहमीची राहणी सुरू होई. उत्तम पुरुष म्हणून यांचा लौकिक दूरवर असल्यामुळे संग्रहास अनेक लोक येत, व अनेक तऱ्हेच्या सल्लामसलती करून जात. कॉलेजांत त्यावेळेला शिकत असलेल्या टिळक वगैरे तरुण मंडळींना अण्णा- साहेबांची राजकीय धोरणे गळीं उतरणें, त्यावेळी शक्य नव्हतें, आणि तीं गळीं • उतरण्यास जवळ जवळ ३०/४० वर्षांचा अनुभव त्यास घ्यावयाचा होता, म्हणून रानडे यांचेच उदाहरण त्यांना त्यावेळी जास्त अनुकरणीय वाटणें साहजिकच होतें. तरीपण अण्णासाहेबांविषयीं एकप्रकारचा मोठा आदर व ४४