पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीदादासाहेब खापर्डे व अण्णासाहेब. ४५. तरी विचारांत त्यांच्या पुरुषोतमत्वाची निर्विवाद जाणीव प्रत्येकास होती, आणि ते त्यांच्या- कडे मधून मधून येत असत. श्री. दादासाहेब खापर्डे यांनी आपला त्यावेळचा अनुभव असाच सांगितला. ज्याच्या त्याच्या तोंडून अण्णासाहेब पटवर्धन हें नांव निघालेले ऐकून हे आहेत तरी कोण, एकदां पहावें अशी त्यांना इच्छा झाली, व ते एकदां सकाळी एकटेच अण्णासाहेबांच्या विहाडी गेले. श्री. दादासाहेब हे स्वतःही श्रीमंतीत रुळलेले असून अंगापिंडाने सुदृढ, गोरेगोमटे व बुद्धिमान् असून, त्यांसही आपल्या श्रीमंतीची व बुद्धिमत्तेची थोडीबहुत जाणीव होतीच. कर्मधर्मसंयोगानें बैठक त्यावेळेस रिकामीच होती, व लोडाशी टॅकून साधी मांडी घालूनच दोन्ही हात स्वस्तिकाकार कार्खेत दावून डोळे मिटून कसल्या- अण्णासाहेब गढून गेलेले त्यांना दिसले. तेथला तो श्रीमंती थाट आणि अण्णासाहेबांची ती धीरोदात्त शांत, व गंभीर अशी कांतिमान् मूर्ति पाहून त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला, व आपण खरोखरच एका महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये आहों असे वाटले. थोड्या-- वेळाने अण्णासाहेबांनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलें, व कोणीकडे आलांत म्हणून चौकशी केली. त्यावरून आपण अण्णासाहेब पटवर्धन यांस भेटावयास -आलो आहों, म्हणून त्यांनी सांगितले. तेव्हां अण्णासाहेब म्हणाले, 'मीच तो आहे,' यावर, ‘ डोळे मिटून आपण काय करीत होतां?' म्हणून मी चौकशी केली, तेव्हां आपण ईश्वर चिंतन करीत असल्याचे त्यांनी सांगितलें,' असे दादा- साहेब सांगतात. एथून पुढे दोघांचा चांगलाच परिचय झाला. दादासाहेब. यांच्यावर अण्णासाहेबांचा अखेरपर्यंत मोठा लोभ होता. या बारा वर्षांत अण्णासाहेब नेहमी मुंबईस होते, असेंच केवळ नाहीं. मधून मधून ते पुण्यास येत असत, व महाराजांची गांठ पड--- ल्यावर आळंदीसही जात. आपली मंडळी अशी यांनी मुंबईस केव्हांच नेली नाहीत. अण्णासाहेबांच्या सर्वसंग्राहकर्तेत दैवी साधनांचाही समावेश असल्यामुळे तसल्याही खटाटोपांत ते असतच. त्यांच्या तेव्हांच्या परिस्थितीत जास्त कर्मठ- पणा करणें त्यांना शक्य नव्हतें, तरी तोंडानें बडवड करण्याची माझी संवय लहानपणापासूनच आहे, म्हणून ते सांगत. पुण्यास त्यावेळी दोन व्यक्तींचा संबंध त्यांस घडून आला, व त्या दोघांपासूनही त्यांना मदत झाली. त्यांपैकी एक श्रीनरसिंहसरस्वती हे होत व दुसरे तात्यासाहेब कर्वे हे होत. पेश-