पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ मुंबईतील बारा वर्षे. व्यांचे कुलोपाध्याय जे कर्वे त्यांच्या वंशांतच तात्यासाहेब कर्वे हे झाले. ब्राह्मण आचाराने मोठा कडकडीत व तेजस्वी होता. असे सांगतात की, मंत्र- शास्त्रांत तो अतीशय निपुण असून अनेक मंत्रांची त्यांस सिद्धि असे. यांच्याशी परिचय झाल्यावर तेथून कार्याच्या दृष्टीने काय फायदा झाला असेल, हें कळ- ण्यास साधन नाही, परंतु पटवर्धनांचें कुलदैवत जें श्रीगजानन त्याची उपासना मात्र श्रीअण्णासाहेबांनी यांच्यापासूनच घेतली. अण्णासाहेब त्यांस नेहमीं गुरू- साहेब म्हणून संबोधीत असत, व त्यांच्या संबंधाने मोठ्या आदरानेंच बोलत. त्यांच्या मंत्रसिद्धीच्या कांहीं गोष्टीही ते सांगत, परंतु त्यांचा या चरित्राशी संबंध नसल्यामुळे त्यांचा उल्लेख करण्याचे कारण नाही. श्रीनृसिंहसरस्वती हे प्रथमतः १८७३ सालीं आळंदीस रहावयास आले. त्यापूर्वी ते एकदां आळंदीस येऊन गेले होते, अशी माहिती मिळते. अशीही एक आख्यायिका आहे कों, अण्णासाहेब लहान असतां डोक्यांवर जटाभार व हातांत दंडकमंडलु अशा वेशानें ते वाड्यांत आले होते, व आंत शिरतांच डाव्या अंगास बसण्याकरितां वाक ठेवलेला असे, तथे बसले. श्रीअण्ण- साहेब यांस ही कोणी गोसावी आला असे वाटून ते बाहेर आले. त्यांची व महाराजांची थोडा वेळ दृष्टादृष्ट झाली, व महाराज उठून गेले. ही आख्या- यिका कशीही असो, पण अण्णासाहेबांचा व महाराजांचा उघड संबंध तात्या- साहेब रायरीकरांमुळे आला. महाराजांची साधारण माहिती स्वतंत्र प्रकरणांत द्यावयाची आहे, तेव्हां येथेंच तिचा प्रपंच करण्याचे कारण नाहीं, परंतु या बारा वर्षांतच त्यांचा संबंध जडला, व त्यांच्या सहवासानें पुढें अण्णा. साहेब यांच्या एकंदर आयुष्यांत मोठीच क्रांति घडून आलेली दिसते, म्हणून येथें उल्लेख केला. अण्णासाहेबांस पाहिल्यावेळेपासूनच महाराजांस मोठा आनंद झाला, व ते त्यांस 'दादा' म्हणून हांक मारूं लागले. ' इकडचा डोंगर तिकडे उचलून ठेवावा, हें याचें काम आहे' असे ते म्हणत, व ' हे आमचें, लष्करी खातें, ' असें म्हणून त्यांची पाठ थोपर्टात. अगदी प्रथमपासूनच श्री- महाराज म्हणजे कर्तुमकर्तु, सर्वव्यापक, सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वरच अशी त्यांची महाराजांविषयी भावना नव्हती. हे कोणीतरी मोठे विद्वान् व चांगले. सिद्ध पुरुष आहेत असे त्यांस वाटे, व महाराजांचा आणि त्यांचा संबंध