पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीनरसिंहसरस्वती व अण्णासाहेब. जरी प्रेमाचा होता, तरी प्रत्येक गोष्टीत तंटा झाल्याखेरीज अण्णासाहेबांची समजूत पटली नाही. अण्णासाहेबांच्या स्वभावपरिपोषास व समजुतीस महाराजांची मदत कसकशी होत गेली, आणि ती किती झाली याचा इतिहास कळणे कठीण आहे. परंतु एवढें खरें कीं, वैदिक संस्कृति म्हणजे काय, व वैदिक आचारविचार याच्या मुळाशी कोणचीं खोल तत्त्वें आहेत, वगैरे गोष्टींची हृद्रतें अवगत होण्यास महाराजांचीच मदत झाली. विश्वाच्या या दृश्य पसान्यामागे अदृश्य असें अनंत विश्व आहे, व त्याचा आणि या विश्वाचा परस्पराश्रय आहे, या गोष्टींचे नुसतें बौद्धिक आकलनच नव्हे, तर सानुभव खात्री महाराजांमुळेच अण्णासाहेबांची झाली; आणि म्हणून याच सिद्धांताच्या पायावर उत्पन्न झालेल्या आर्य संस्कृतीच्या सर्व प्रकारच्या रूपांची उपपत्ती त्यांस लावतां येत होती. परंतु या विषयाचे वेगळेच सदर घालावयाचें आहे, म्हणून येथें नुसता त्रोटक उल्लेख केला. त्या वेळीं यांचे व महाराजांचे संबंध कोणत्याही स्वरूपाचे असोत, परंतु एवढे खरें कीं वारंवार पुण्यास येऊन एकवार आळंदास जावें, आणि आपल्या सर्व खटाटोपांचा पाढा महाराजांकडून मुकाट्यानें ऐकवून घ्यावा, असे नेहमी घडत असे; व तेव्हांही यांच्या मनांत महाराजांच्याविषयी एवढा आदर होता की, आळंदीस गेल्या- वर आपला श्रीमंती पोषाख आणि ऐटबाज रेशीमकाठी धोतर सोडून ठेवून, साधें धोतर नेसल्याखेरीज महाराजांच्या समोर अण्णासाहेब केव्हांही गेले नाहीत. तेथे त्यांच्या ज्या कांही गोष्टी होत, त्या कधीं दुसऱ्यासमोर होत नसत. सारी निजानीज झाल्यावर रात्री २ वाजतां सारी मसलत चालावयाची; व लोकांसमोर उगीच कसले तरी भांडण चालावयाचें. त्याच्या पुष्कळ गंमती ते सांगत असत. एकदां, महाराज पुराण सांगत असतां कांही वेदातांचा भाग त्यांनी समजून सांगितला. तेव्हां सर्व श्रोत्यांनी आनंदानें माना डोलविल्या, परंतु अण्णासाहेब तसेच बसून होते. त्यावर 'कायरे दादा, समजले का ? ह्मणून त्यांनी विचारलें. तेव्हां अण्णासाहेबांनी उत्तर दिलें, “ ही सारी लबाडी आहे. मला तर समजलें नाहींच, परंतु माना डोलविणाऱ्या या सर्वांनाही कांहीं समजले नाही, व समजणे शक्य नाहीं, हें आपणास ठाऊक आहे, असें असून प्रश्न कां विचारतां ? " अशा तऱ्हेचे कांही तरी बोलणें निघे, व मग " ४७ .