पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. महाराज रागावल्याचें सोंग करून 'तुला समजत नाही, पुराणांत मध्ये बोलत आऊं नकोस, ' ह्मणून बसण्याची बंदी करीत, व अण्णासाहेबही २१४ दिवस त्याप्रमाणे वागत. परंतु ते त्यांस बरें वाटत नसे, आणि मग 'दादा आतां मध्यें बोलणार नाही,' अशा प्रकारच्या तात्यासाहेबांच्या मध्यस्थीनें पुन्हा पुरा- णास येत. परंतु एकदोन दिवस गेले कीं महाराजांनाही ठीक वाटत नसे, आणि त्यांनी स्वतःच कांही तरी भांडण उकरून काढावें, अशी मौज नेहमींच चाले. एकदां पुराणांत शरीराचा विषय निघाला असतां, शरीराच्या Dis- section चा प्रश्न, निघाला, आणि “ आम्ही चिरफाड करून हे सर्व अवयव ४८ पाहतों' असे अण्णासाहेब म्हणाले. त्यावर “ मढ्याचें Dissection करून 66 " व काय उपयोग ? जिवंत शरीराच्या आंत पाहिले पाहिजे, " असे त्यांनी अण्णा- साहेबास सांगितले. त्याच वेळी हा अनुभव त्यांनी अण्णासाहेबांस दिला किंवा नाहीं, हें सांगवत नाही, परंतु पुढे एकदां याच विषयावर बोलत असतां " जो आंत पाहील त्यास निरनिराळ्या प्रकारचें काम करणाऱ्या भिन्न भिन्न शक्तीचा मोठाच लखलखाट दिसेल,” असे अण्णासाहेब ह्मणाले होते. असेंच डोळ्यांच्या रचनेविषयीं व दृष्टांविषयी विषय निघाला असतां, 'डोळ्यावांचून पाहणें ते खरें पाहणें,' असें महाराज ह्मणाले. अण्णासाहेब ह्मणाले, ' हैं कसें घडेल ? जवळच पडलेला कागदाचा एक तुकडा घेऊन महाराजांनी त्यास भोंक पाडलें काय तुला पहावयाचे आहे, पहा, ह्मणून सांगितलें. त्यावेळी काबूल येथें लढाई सुरू होती, तीच आपण पहावी असे अण्णासाहेबांस वाटलें. तोंच त्यांस तो सर्व देखावा प्रत्यक्ष डोळ्यांपुढे दिसूं लागला, व तसेंच पुढें वर्तमान- पत्रांत लिहून आलें. थोड्या वेळानें महाराजांनी कागद परत घेतला आणि फाडून टाकला. अशाच एका प्रसंगी, तात्यासाहेब रायरीकरांच्या येथें योगी लोक आंतडी काढून धुतात कशीं, याचा थोडा प्रयोग महाराजांनी करून दाखविला. त्या प्रसंगी हल्ली विद्यमान असलेले महाराजांचे भक्त रा. विश्वनाथ निळकंठ बापट हे स्वतः हजर होते, व परातींत आतडी धुतल्यावर परत आंत खेचतांना मंडळींच्या हलगर्जीपणामुळे धक्का बसून महाराजांस बरेच दिवस कांहीं व्यथा सोसावी लागली, असे ते सांगत. येथेंच हेंही सांगावेसें वाटतें कीं, संपूर्ण आंतडी बाहेर काढून आंत खेचण्याचा प्रयोग संगमावरील ' बोडखा ' नांवाच्या एका उदासी साधूंनी त्यांस पुढे करून दाखविला.. . 6