पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांहीं यौगिक क्रिया, व अतींद्रियत्वाचे दाखले. ‘ शरीराचें सर्व कातडें एकसंधी आहे हें तुह्मांस माहीत आहे, व तुझीं स्वतः डॉक्टर आहां, असे असतां असल्या प्रकारावर तुमचा विश्वास कसा बसतो ? - डॉक्टरलोक याच प्रकारास मूर्खपणांत व लफंगेगिरीत काढतात ' असे मी विचा- रलें असतां, अण्णासाहेब यांनीं ' ते मूर्ख आहेत, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलें आहे,' म्हणून 'बोडख्यांची' (एक साधु ) हकीगत सांगितली, आणि हें कसें घडतें तें सुलभ रीतीनें समजावून दिलें. ढेकूण वगैरे पाहण्याकरितां बाही आपण उलटी करतो त्याप्रमाणें अपानवायूनें आंतडी बाहेर फेंकावयाची असतात, व क्रिया झाल्यावर प्राणवायूने पुन्हा तीं आकर्षण करावयाची असतात. मात्र असे करण्यास अविकृत ब्रह्मचर्य आणि विलक्षण तंतुवल ( Nervous Strength ) लागतें. आंतडी बाहेर काढणे म्हणजे शरीरापासून अलग करून घ्यावयाचीं, असल्या अडाणी कल्पनेमुळे अर्वाचन लोकांस ही गोष्ट खरी वाटत नाही. असो. तात्यासाहेब कर्वे हेही असेच सामर्थ्यसंपन्न होते, व त्यांच्याही गोष्टी अण्णा- साहेब सांगत. गणपतराव सोहनी हे तात्यासाहेबांचे शिष्य होते, व त्यांच्या विनंतीवरून तात्यासाहेबांनी गणपतरावांना कांहीं साधन सांगितले होते, त्यामुळे आपलें शरीर सुषुप्त ठेवून गणपतरावांस लिंगदेहानें विहार करतां येई, आणि वाटेल तेथील खवर आणतां येई; मात्र स्थूलशरीराहून लिंगदेह वेगळा होतो कसा, व पुन्हा आंत शिरतो कसा, हे त्यास समजत नसे, व आपण हें लिंग- देहानें करतों अर्से भान नसे; परंतु आपला देह झोंपी गेलेला ते पहात, व त्या जवळून स्वेच्छेनें दूर जात. त्यांच्या या सिद्धीचे पडताळे पाहून आपण पुष्कळ प्रयोग केले, म्हणून अण्णासाहेब सांगत. एका प्रसंगी तर असें झालें कीं, काबूलास त्यांस पाठविण्यांत आले. त्या वेळेस एका झाडापाशी उभे राहून ‘आपण लढाई पहात आहों, असें त्यांस वाटत होतें. पाहण्याच्या भरांत दुरून सुटलेली गोळी आपणास लागते अशी भावना होऊन त्यांनी घाईनें डोकें फिर- विलें. त्याबरोबर झाडाच्या फांदीवर आपटून त्यांस टॅगूळ आले. पुढे देह- स्थितीवर आल्यावर पाहतात तो खरोखरच टेंगूळ आलेलें ! हा प्रकार कसा घडला असेल, हें सांगतां येत नाहीं. तो विषय सूक्ष्मेंद्रियशास्त्र जाणणाऱ्यांचा आहे. परंतु असें घडलें, एवढे माल अण्णासाहेब सांगत असत. यावरून ४ Q ४९