पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० मुंबईतील बारा वर्षे. • आपणही हा अनुभव घ्यावा असे वाटून, गुरुसाहेबांस त्यांनी ती विद्या मागि- तली. परंतु हें क्षुद्र साधन तुझ्या योग्यतेचें नाही म्हणून त्यांनी सांगितले. अशा तऱ्हेच्या अतींद्रियत्वाचा प्रत्यक्ष दाखला देणाऱ्या दोन महापुरुषांच्या सह- वासांत अण्णासाहेब यांच्या मनाची चलबिचल होऊन, केव्हां इकडे तर केव्हां तिकडे असे त्यांचें मन ओढत असे किंवा नाहीं, हें सांगतां येत नाहीं. तरी- पण महाराजांचा याहीपेक्षां मोठा चमत्कार पाहून आणि लोभ संपादूनही त्यांनी श० १७९९ वैशाख वा ४ या दिवशीं, पटवर्धनाचें कुलदैवत व त्यांच्या मातु- श्रीचें उपास्य जें श्रीगजानन याची उपासना तात्यासाहेबांपासूनच घेतली. यावरून मनांत बरेच तर्क येतात व कांहींच निर्णय होत नाही. मी स्वतः एकदां त्यांस, महाराजांची एवढी प्रचीति घेतल्यावरही तात्यासाहेबांकडून उपा- सना कशी घेतली, असा प्रश्न केला होता. त्यावर त्यांत काय झालें ! ' एव- ढेंच उत्तर मिळालें. मी पुन्हा प्रश्न केला, 'श्रीनींच तसे करावयास सांगितलें होतें काय?' त्यावर ते 'नाही' म्हणून म्हणाले. वर सांगितलेला चमत्कार असा- इ. स. १८७७ च्या फेब्रुवारीत अण्णासाहेब चासेस गेले होते. तेथें नाना- साहेबांचे कुटुंब गंगाबाई या अतीशय आजारी होत्या. त्यांना पाहून अण्णा- साहेब पुण्यास परत जावयास निघाले, परंतु ते तितक्यांतच जातां जातां महा- राजांची गांठ घेऊन जावे असे वाटून, मुद्दाम आडवाट करून ते आळंदीस आले. ते दिवशीं रविवार असून वसंतपंचमी होती, व फेब्रुवारीची १९ ता. होती. अण्णासाहेब आले तेव्हां २॥-३ वाजण्याचा सुमार होता. त्यावेळी खंडोबाचें देऊळ बांधणे चाललें होतें. तेथें छोटासा मांडव पडला असून खूप समाज जमला होता, आणि जेवणाचा सपाटा चालला होता. जव ळच थोड्याशा अंतरावर, जरीची टोपी डोक्यास घालून महाराजांची स्वारी विटांच्या ढिगावर बसली होती. अण्णासाहेब यांनी नमस्कार करतांच, 'दादा कपडे काढून जेवून घे, आज आपल्या त्रिंबकाची मुंज झाली, ' म्हणून आज्ञा झाली. त्या दिवशीं पंचांगांत मुंजीचा मुहूर्त नव्हता. परंतु उगाच वेळ न लावतां अण्णासाहेब जेवावयास बसले. जवळच समोरच्या अंगास एक दुधाचें मोठें भांडे खांबाशीं टेंकून कलतें ठेवलें होतें. त्यांत लहान भांडी बुचकळून वाढावयास नेत. भांडे फारतर दहा बारा शेर दूध मावण्यापुरतें होतें. भोजन करतां करतांच आदल्या दिवशीं संध्याकाळी मुंजीचा बेत श्रीनी एकाएकी P