पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7642 श्रीमहाराजांचा एक चमत्कार; श्री तुकोजीराव होळकर. ५१ कसा ठरवला, व पंचांगांत मुहूर्त नव्हता तरी जास्त पाहिल्यावर अर्ध्या घट- केचा मुहूर्त कसा सांपडला, व रात्री गडबड होऊन सकाळींच मुंज कशी लागली, आणि तेव्हांपासून सारख्या पंक्ती कशा सुरू आहेत, वगैरे हकीकत त्यांस सम- जली. त्यावरून अण्णासाहेबांचें लक्ष दुधाच्या भांड्याकडे गेलें, आणि एवढ्या दहावीस हजारांच्या समाजास इतकेंसें दूध कसें पुरत आहे, याचा त्यांस विस्मय वाटला. याविषयीं ते कांहीं उद्गार तोंडांतून काढणार, तोंच विटांच्या ढिगा- वरून महाराज ओरडले कीं, 'दादा, पुढे पाहून जेव मुकाट्यानें. इकडे तिकडे 'पाहण्याचे काम नाहीं!' त्या दिवशी रात्री सर्व निजानीज झाल्यावर अण्णासाहेबांस हाक मारून श्रींनी सांगितलें कीं, 'दादा ती माणसेंही येथली नव्हतीं, आणि ती सा- मुग्रीही येथली नव्हे!' यावरून अण्णासाहेबांस काय वाटले असेल हें कोणीं सांगावें ! •असे असतांही यानंतर अगदी थोड्या दिवसांनी म्हणजे ३ महिन्यांचे आंतच त्यांनीं 'तात्यासाहेबांपासून उपासना कां घेतली, हें एक मोठें गूढच आहे; असो. पुण्यास आले म्हणजे महाराजांचा सहवास करावा, व मुंबईस बाकीच्या खटा- टोपी कराव्या, असे या काळांत अण्णासाहेबांचे चालू होते. त्या खटाटोपीच्या प्रसंगानेंच इंदूरचे श्रीमंत तुकोजीराव होळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. कित्येक प्रकारच्या राजकारणाकरितां मुंबईच्या आसपास मोठी जमीन घेऊन ठेवावी, व तेथें आपला एक माणूस नेमावा, अशी त्यांची इच्छा होती. या कामांतील त्यांचे सल्लागार कोणी कुंटे म्हणून होते. त्यांचा व अण्णासाहेबांचा परिचय असल्यामुळे, त्यांनी योग्य माणूस म्हणून अण्णासाहेब यांचें नांव सुचविलें. तेव्हां हा माणूस एकदां पाहिला पाहिजे, अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. मात्र त्यांची अट अशी होती की, प्रत्यक्ष तुकोजीराव आपणास भेटत आहेत, हें अण्णासाहेबांस कळतां कामा नये. महाराजांच्या खासगी कारभाऱ्याची प्रथम भेट करवितों, असें सांगून कुंट्यांनी अण्णासाहेबांस नेलें. स्वतः तुकोजीराव हे अगदी साधा पांढरा शुभ्र पोषाख करून, व पांढराच कोशा डोक्यास गुंडाळून त्यांस भेटले, व दोघांचें बरेंच संभाषण झाले. प्रथम दर्शनींच अण्णासाहेबांनी हा बनाव ओळ- खिला, परंतु तर्से न दाखवितां भाषण करून त्यांनी तुकोजीरावांस गार केले. विशेषतः जमीन घ्यावयाची ती, दीव वगैरे बाजूस पोर्तुगीज वगैरे इतरांच्या प्रदेशांतील घ्यावी, इंग्रज मुलखांतील नसावी, ही त्यांची सूचना तर