पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील वारा वर्षे. राजे यांस फारच पसंत पडली, आणि अण्णासाहेबां विषयी त्यांचा ग्रहही फार अनुकूल झाला; परंतु दुसऱ्याच कांही एका कारणानें दोघांनाही हा बेत सोडून द्यावा लागला. यानंतर त्यांची उघड उघड भेट पुढे एकदांच झाली होती. कांही प्रसंगानिमित्त मुंबईस तुकोजीराव आले होते. त्यांना इंदुप्रकाशतर्फे झालेल्या पानसुपारीच्या वेळी अण्णासाहेब हजर होते. रीतीप्रमाणें इतर मंडळी- मिळतीं, त्यांचीही ओळख करून दिली गेली. त्यावेळेस अण्णासाहेब यांनी पूर्वीचा कांहीच संबंध न दाखवितां नुसतेच हस्तांदोलन केलें. तेव्हां तुकोजीराव यांनी थोडे तोंडांतल्या तोंडांत हांसून पूर्व परिचयाची खूण दिली. गर्दी कमी झाल्यावर त्यांनी अण्णासाहेब यांस एकीकडे बोलावलें, व मग त्यांचे पुष्कळच भाषण झालें. मुंबईत असतांना अशाच दुसऱ्या एका वड्या गृहस्थाशी त्यांचा परिचय झाला, व त्याला निमित्तही अरा गमतीचें घडलें. हे वडे गृहस्थ म्हणजे बंडाच्या वेळी जयाजी- राव शिंद्यास मेजर लॉरेन्सच्या स्वाधीन करणारे आणि If shindya joins, I shall have to pack off अशी कनिंग साहेबांची भीति कायमचीच दूर करविणारे राजे दिनकरराव राजवाडे होते. यांचा मुक्काम एकदां आंग्यांच्या वाडींत असतां अण्णासाहेबांस अशी इच्छा झाली की याही पुरुषास एकदां पाहून ध्यावें. तेव्हां एकदां दुपारी जेवणखाण झाल्यावर हातांत नेहमीचा सोटा, अंगांत नुसता सद्रा आणि डोक्यास बदामी रंगाचा रेशमी फेटा, अशा तालिमवाजी थाटानें अण्णासाहेब त्यांच्या विहाडी गेले. त्यावेळी दिनकरराव माडीवर एकटेच बसले होते, व खाली एक ब्राह्मण धुणे वाळत घालीत होता, त्यास वर्दी पोहोचविण्यास अण्णासाहेबांनी सांगितलें. स्वतः दिनकरराव यांस स्वर- शास्त्राचा उत्तम अभ्यास होता, व त्यांची सारी कामें त्या शास्त्राच्या तंत्रानें ठराविक दिशेस बसून, ठराविक दिशेकडे तोंड करून ठराविक वेळेला होत. त्या वेळेस ते वामकुक्षी न करतां दिवाणखान्याचे एका कोपन्यांत बसले होते. शागीर्दीनें वर्दी पोहोंचवितांच त्यांचा सूर प्रतिकूल पडल्यामुळे निजले आहेत, यावेळी भेट होणार नाहीं, पुन्हा या,' म्हणून सांगावयास त्यांनी सांगितलें. परंतु हा कोपरा जिन्याच्या भिंतीचाच व दाराजवळ असल्यामुळे जिन्याच्या तोंडाशी असलेल्या अण्णासाहेबांस तें स्पष्ट ऐकूं आलें. निरोप ऐकून 'बरें आहे, ’ असें म्हणून थकल्यासारखें करून जवळच बाक पडला होता, त्यावर