पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. श्रीमंत दिनकरराव राजवाडे व अण्णासाहेब. ५३ अण्णासाहेब बसले, व संशयाचें कांहींच कारण नसल्यामुळे शागीर्दही आपले काम करूं लागला. तेवढ्यांत यांनी वर जाऊन दिनकरराव यांस गांठले व त्यांचेसमोर आपला दंडा आडवा ठेवून जवळच ठाण मांडून बसले ! तेव्हां नाइलाज होऊन राजे यांनीं ' कोण व कोणीकडे आलांत, ' म्हणून चौकशी केली, त्यावर ' मी एक कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, व आपल्या- सारख्या महापुरुषास पहावें म्हणून आलों,' असे अण्णासाहेबांनी सांगितलें. त्यावरून पुढे पुष्कळच बोलणे झालें, व 'आपण हें काय केलेत ? हिंदुस्थानचा सर्वस्वीं घात करून पुण्य तरी कोणतें संपादलेत ? अथवा इंग्रजांची जोड करून ऐहिक लाभ तरी काय मिळविलांत ? उलट वेदधर्म आणि वैदिक संस्कृति यांचा नायनाट झाला, व सुखांत लोळत असलेल्या एका राष्ट्राची विपन्न स्थिति होऊन अनंत पिढ्यांचा तळतळाट माल घेतलांत, तेव्हां आपली योग्यता फारच मोठी आहे, आपल्याच हातानें आपल्या माणसांचे गळे कापणारा महा- पुरुष कसा असतो, तें पहावें म्हणूनच मीं आलों, ' म्हणून अण्णासाहेबांनी खडखडीत सांगितलें. कोणाही माणसाकडून उपमर्द करून घेण्याची संवय नसलेल्या सरदारसाहेबांची मिजास हे भाषण ऐकून जाग्यावर राहणे शक्य नव्हतें. परंतु अण्णासाहेबांची आकृति, त्यांची मुद्रा, अंतःकरण तुटून निघणारे तरवारीच्या धारेसारखे शब्द, आणि त्याहीपेक्षां त्या भाषणांतील सत्य, यामुळे दिनकरराव विरून गेले, आणि त्यांच्या डोळ्यांस पाणी आले. एवढ्या अमोल कामगिरीबद्दल त्यांच्या कल्पनेप्रमाणे एकादें मोठें संस्थान न देतां कोकणांत ५ हजारांची किरकोळ जहागीर देऊन सरकारने त्यांची संभावना केलीं होतीं. जयाजीरावांकडून मात्र बरीच मोठी जहागीर देवविली होती. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणास लागून राहिली होती, आणि 'आपला मूर्खपणा झाला खरा,' असे त्यांचें मन त्यांना खात होतें. नेमका तोच पाढा निर्भीडपणानें व कळकळीने त्यांच्यापुढे मांडल्यामुळे, त्यांस अतिशय दुःख झाले, व त्यांनी उघडपणें ' आपण मूर्खपणा केला, अशा थराला गोष्टी येतील असें तेव्हां वाटले नाहीं, काय बुद्धि तेव्हां झाली कांही कळत नाहीं, ' असे कवूल केलें. यावर ‘ झालें झालें, अजूनही आपलें सरकारांत चांगलें वजन आहे, तेव्हां कधीं कुठे प्रसंग पडल्यास आपल्या इमानास जागा, ' असें अण्णासाहेबांनी त्यांना सहज बजावलें. या सहज केलेल्या सूचनेचा पुढे किती चांगला फायदा व्हाव-