पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. याचा होता, याची तेव्हां अण्णासाहेबांसही कल्पना नव्हती. दिनकररावांनीही मनापासून ती गोष्ट कबूल केली, तेव्हां आपली आठवण असूं द्यावी, असें सांगून अण्णासाहेब उठू लागले. त्यावर त्यांस पुनः वसवून घेऊन राजेरावानी पानसुपारी घेण्याचा आग्रह केला. परंतु • स्वदेशाच्या रक्तानें कलंकित झालेल्या सुपारीचें खांडही खाणे महापाप आहे, आणि आपल्या येथे पाण्याचा एक घोटही घेणे योग्य नाहीं, ' असें उघड उघड त्यांस उत्तर मिळाले. त्यामुळे जास्तच दिपून जाऊन ' कोण, कुठले, ' म्हणून त्यांनी चौकशी केली; व जेव्हां भाऊसाहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांस कळले, तेव्हां त्यांस कसेंसेंच होऊन तुम्ही मला फसविलें; मी हें भाऊसाहेबांस सांगेन; आधीच मला नांव कां सांगितलें नाहीं, ' असे म्हणून त्यांनी थोड्याशा संतोषानें अण्णासाहेबांस दारा- पर्यंत पोहोंचविलें व त्यांस निरोप दिला. मल्हारराव प्रकरणांत अण्णासाहेबांस दिनकररावांच्या ओळखीचा फार फायदा झाला, असे म्हणतात. मुंबईस असतांनाच अण्णासाहेबांच्या आयुष्यांतील एक चमत्कारिक प्रसंग घडून आला. तीन गोष्टींचा संपर्क सबंध आयुष्यांत आपल्यास कधींच झाला नाहीं, ह्मणून ते सांगत असत. अभक्ष्यादिकांचा त्यांस संपर्क होणें शक्यच नव्हतें, परंतु कोणत्याही तऱ्हेची भीति आणि स्त्रीविषयक वासना अथवा मोह हीं आपणास केव्हांही शिवली नाहीत, असे त्यांनी एकदां सांगितले. त्यांचें सुंदर शरीर व एकंदर राहणी अशी होती कीं, साधारणतः कोणाही स्त्रीची नजर खिळून जावी; परंतु त्याजबरोबर त्यांचे वागणे अशा तऱ्हेचें होते की, भोवतालच्या मंडळीं- च्या मनांत त्यांचेविषयीं एक प्रकारचा विलक्षण दरारा असे, आणि त्यांच्याशी काडा इतकाही अतिप्रसंग करण्याची कोणाची छाति नसे. मेडिकल कॉलेजमधें असतां एका पार्शी सुंदरीने मोह पाडण्याचा कसा प्रयत्न केला, व 'तात्या ' 'तात्या ' ह्मणून लाडानें जवळ येत असतां, आपल्या कठोर नजरेनें तिची कशी त्रेधा उडून गेली, व ती पळून गेली, त्याची हकीगत त्यांच्या तोंडून वामनानें ( याची थोडीशी हकीगत पुढे येईल ) ऐकली होती. असाच दुसराही एक प्रसंग झाला. यांच्याच बैठकींतील कांहीं मंडळीनी यांना जाळ्यांत गुंत वावें ह्मणून एक कट केला. एका सुंदर व प्रख्यात गाणारणीची बैठक करवून अण्णासाहेबांस आमंत्रण करण्यांत आले. पूर्वी ठरल्याप्रमाणें विश्रांतीकरितां ती स्वस्थ बसली असतां, चहा कॉफी पिण्याच्या, कोणी विड्या ओढण्याच्या अशा (