पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक चमत्कारिक प्रसंग, मुंबईची दुखणी. कांहींतरी निमित्ताने एकेक जण तेंथून निघून गेला, आणि अण्णासाहेब व ती वेश्या ही दोघेंच तेथें राहिली. हे पाहून अण्णासाहेब जावयास निघाले, आणि पहातात तो दारास बाहेरून कडी लावलेली ! मोहास बळी पडण्याची त्यांस भीतीच नव्हती. परंतु एक तर विनाकारण अब्रूची नुकसानी, आणि दुसरें, सर्व तऱ्हेनें पवित्र राखलेल्या शरीरास एका घाणेरड्या स्त्रीचा स्पर्श होऊन तें विटाळणार, यामुळे त्यांस थोडा विचार पडला. परंतु आपला बेत दिसूं दिल्यास गळ्यांत मिठी पडून शरीर विटाळेल, तरी तसें न व्हावें ह्मणून गड- बड करण्याचा बेत टाकून दिल्यासारखें त्यांनी दर्शविलें, व डोईचें फेंकून देऊन, उपरणे डोक्यास गुंडाळून, सहजगत्या ह्मणून गच्चीवर उभे राहिले. आपण काय करावें, ह्मणून ती वेश्याही विचारांच पडली होती. यांच्या वर्त- नानें फसून जाऊन, हे आतां आपल्या ताब्यांत येतील अशा आशेनें ती त्यांच्याकडे पाहूं लागली. तोंच श्रीअण्णासाहेबांनी कठड्यावर पाय ठेवून खालीं उडी टाकली ! माडी पुष्कळच उंचीवर होती, व इत उंचीवरून उडी टाकल्यामुळे मोठा अपघातच व्हावयाचा; परंतु सुदैवानें तसे झाले नाहीं. तेव्हांपासून मंडळी मात्र आपापले ठिकाणी चपापून गेली; व पुढे कोणीही कधी त्यांच्या वाटेस गेला नाही. मुंबईच्या यांच्या रहिवासांतील सांगण्यासारख्या किरकोळ गोष्टी ह्मणजे एकदां यांस साठ दिवसांचा झालेला विषम, आणि हाताचा अपघात. याविषयीं ते असे सांगत कीं, बाजूची मंडळी औषधोपचार करण्याची फार खट- पट करी, परंतु विषम आहे असें लक्षांत येतांच त्यानीं असा क्रम ठेविला की, आणलेली औषधें जशीच्या तशीच मोरीत फेंकून द्यावी, आणि एक लहानशी ठरा- वीक वाटी भरून भात व तेवढेच पाणी नेमानें घेऊन मुकाट्यानें पडून रहावें. यांच्या प्रकृतीचा हा विशेष गुण होता की, त्यांस पाणी प्यावयास अतीशयच थोडें लागे. यांच्याइतकें कमी पाणी पिणारा माणूस पाहण्यांत येतच नाहीं. उन्हाळ्याचे दिवस नसतांना, स्नानसंध्येत पोटांत जाणाऱ्या पाण्यापलीकडे यांस पाणी पिण्याची आवश्यकता कधी वाटली नाहीं, व उन्हाळ्याचे जरी दिवस असले, आणि नीटनेटके खाणेंही झाले असले, तरी देखील एकाद्या प्याल्यापलीकडे, ह्मणजे सुमारें ५/१० तोळे पाण्यापलीकडे जास्त पाणी पितांना त्यांस कोणी पाहिले नाहीं ! असी. अशा रीतीनें साठ दिवस काढल्या-