पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. वर ताप उतरला, व मंडळी औषधोपचासची तारीफ करूं लागली. तेव्हां त्यांची सारी औषधें कोठें गेलीं तें अण्णासाहेबांनी दाखविल्यावर सर्वांस मोठी मौज वाटली. तसेच, एकदां ते विहीरीच्या काठावर बसले असतां एका- एकीं खाली पडून यांचा हात मोडला होता, परंतु योग्य • उपाय करण्यांत आल्यामुळे तो चांगलाच सुधारला आणि पुढे कोणासही तें व्यंग दिसून आलें नाहीं. मूळव्याधीची उपाधी यांना लहानपणापासूनच होती, व तिचा त्रास मुंबईस असतांही होत असे. याशिवाय इतर कांही त्रास या बारावर्षात झाल्याची माहिती नाही. यांना मोठी खोड ह्मणजे पोटांत पडल्यावर थोडावेळ तरी निजले पाहिजे, अशी होती, व ती शेवटपर्यंत तशीच होती. असे थोडे तरी पडावयास न सांपडल्यास त्यांच्या प्रकृतीची घडी थोडी तरी बिघडत असे, व तेवढ्याकरितां सवड नसल्यास ते खाण्यापिण्यासच फांटा देत ! 'ही संवय आपणास बाळपणापासूनच होती, व कॉलेजमध्ये वगैरे देखील एका बाजूस बसून, दुसन्यी विद्यार्थ्यांचे आड आपण झोप काढीत असूं,' ह्मणून ते सांगत. त्यावेळी पान तमाखूचें यांस विलक्षणच वेड होते, परंतु एका प्रसंगाने त्यांनी तें झटकून टाकलें, व पुढे देखील कोणी आग्रहानें दिल्याखेरीज, स्वतः होऊन कधी त्यांचे सेवन केले नाहीं. तो प्रकार असा:- यांचा असा प्रघात असे की, सुमारें अदपाव तमाखू व त्यामानानेंच शेंदीडशें पानें रोज फस्त करा- वयाचीं, परंतु कधीं पीक बाहेर टाकणें ठाऊक नव्हतें! आणि पुढे देखील तमाखू खाऊन थुंकणाऱ्या माणसाची ते अतीशय चेष्टा करीत. एक वेळ असा योगा- योग झाला कीं, बोलण्याचे भरांत भान न राहून तमाखूची थुंकी यांनी बाहेर टाकली. कर्मधर्मसंयोगानें यांच्या कॉलेजांतील एक प्रोफेसर त्याच वेळी खालून चालले होते, त्यांनाच हा प्रसाद मिळाला | प्रोफेसर साहेबांनी मोठ्या त्वेषानें मान वर केली, परंतु अण्णासाहेबांस पाहतांच थोडेसें हंसून त्यांनी रस्ता सुधारला. या गोष्टीची स्वतः अण्णासाहेबास एवढी लाज वाटली की, त्यांनीं लागलीच एका ब्राह्मणास बोलाविलें, आणि चांदीच्या सर्व उंची संचासह ती पानतमाखू त्याच्या पदरांत टाकली, आणि तेव्हांपासून आमरणांत तिला आपण होऊन हात लावला नाहीं ! कोणत्याही प्रकारचा अशा तऱ्हेचा त्याग हा त्यांचा स्वभावधर्मच होता. यांच्या घराण्यांत एक फार मोलाची हिऱ्याची आंगठी होती, व त्या आंगठीस तिच्याशी संबंध असलेल्या कांहीं इतिहासा-