पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या संग्रहांतील कांहीं मंडळी. रावाचें होतें. स्वयंपाकी म्हणून राहिलेला हा गृहस्थ कांहीं औरच आहे, असे अण्णासाहेबांनी तेव्हांच ओळाखेलें, व पुढे यानेंही आपली सर्व हकीगत सांगि- तली. तेव्हां त्यास नांवास स्वयंपाकी म्हणून अण्णासाहेबांनी जवळ ठेवून घेतला, व दुसऱ्या स्वयंपाक्याची योजना केली. हा सर्व व्यवस्था पहात असे, व त्याची बायकोही मोलकरीण म्हणून राहिली होती. परंतु, झाडसारव करणें, निसणें-- टुपणें यांपलीकडे हलकीं कामें तिला त्यांनी कधींच सांगितली नाहीत. खालच्या मजल्यावरील एक खोली स्वतंत्र त्यांना दिली होती, व तेथें ते रहात. असे कैक. लोक त्यावेळेस सर्वत्र हिंडत होते; आणि त्यांना एकत्र करून पुन्हा जंग कर ण्याची हिंमत वासुदेव बळवंताने धरली असल्यास अगदीच आश्चर्य नाही. या गणपतरावाच्या म्हणण्याप्रमाणें, नानासाहेबांवर बंड उपस्थित केल्याचा नुसता आळ आहे, ते प्रथमपासूनच विरुद्ध होते, परंतु नाइलाज म्हणून त्यांस वंडांत सामील होणे भाग पडलें, मात्र भाग घेतल्यावर मोठ्या शौर्याने त्यानीं काम. केलें, असेंच दिसतें. या भटकणाऱ्या लोकांची कल्पना येणारी एक गोष्ट अण्णासाहेब सांगत असत. वर्तमानपत्र वाचीत, आंतल्या अंगास अण्णासाहेब बसले होते, व पुढील खोलीत गणपतराव भाजी चिरीत होते. इतक्यांत ' खारे पिस्ते, ' असा आवाज करीत एक फेरीवाला दाराशी आला. तेव्हां जरा गडबडून गणपत- रावानें मुद्दाम पुढे वांकून त्यास पाहिले, आणि दोघांची दृष्टादृष्ट होतांच किंचित् हास्य करून तो पिस्तेवाला पुढे निघून गेला. अण्णासाहेबांचें लक्ष आपल्याकडे होते की काय हैं पाहण्याकरितां एक दृष्टी त्यांच्याकडे टाकून गणपतराव कामांत गढून गेला. थोड्या वेळानें अण्णासाहेबांनी 'फेरीवाला कोण होता, व तुमची काय खूण पटली, ' म्हणून उघडच विचारले. त्यावरून त्यांनी सर्व हकीकत सांगितली. तो इसम मुसलमान असून मोठ्या घराण्यांतला होता; व बंडाच्या उत्पादकांपैकी एक प्रसुख होता. त्यानंतर त्याची फेरी आली म्हणजे, मुद्दाम त्यास बोलावून पुष्कळ किंमतचे पिस्ते विकत घ्यावे, असा क्रम पडला. अण्णासाहेब मद्रासस गेल्यावर या माणसांचे पुढे काय झालें, तें कांहींच कळलें नाहीं. पेरुअय्या हा तेलंगा ब्राह्मण अशाच रीतीनें आश्रयास आला. तो स्वभा वानें साधाभोळा परंतु बाणेदार होता. कमरेला एक पंचा, अंगावर उपरणें, आणि डोकीस फडके गुंडाळलेले अर्से हें काळेकुट्ट ध्यान पाहून, येथें कांह