पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० मुंबईतील बारा वर्षे. विशेष असेल, अशी कोणास कल्पनाही व्हावयाची नाही. परंतु गायनकलेंतील ती एक अपूर्व वस्तु होऊन गेली, म्हणून अण्णासाहेब सांगत, व त्याचे गाणें कानांत असल्यामुळे, रहिमतखां - सुद्धां कोणाचेहि सूर आपल्या कानांत भरत नाहीत, म्हणून ते सांगत. गुरुवरअय्या म्हणून एका गृहस्थापाशी बारा वर्षे अध्ययन केल्यावर पोटाच्या मागे लागून आपण बाहेर पडलों, म्हणून तो सांगत असे. त्याची वृत्ति अत्यंत निस्पृह, आणि नम्न होती. गुणाचें प्रदर्शन करण्याचा कल त्यास ओकारीसारखा वाटे. त्याची मोठी खोड. म्हणजे, त्याला नित्य कांहीं तरी पक्कान्न पानांत लागे. अशी सोय असली म्हणजे स्वारीची कळी खुलत असे. त्याच्याकरितां श्रीखंड वगैरे कांहीं तरी पदार्थं रोज करण्याची सोय अण्णासाहेबांनी लावून दिल्यावर, अण्णासाहेब यांचेजवळ तो पुष्कळ दिवस मोठ्या आनंदांत राहिला. वारा वर्षांत फक्त सूर काढण्याचाच अभ्यास त्यानें केला होता! परंतु ते सूर कसे असत, हें दोन तीन उदाहरणां- वरून समजून येईल. आर्यवैद्यकांत ज्याला सन्निपात म्हणतात, त्या तापाचें असे लक्षण आहे कीं, रोग्यास झोंप मुळींच येत नाही; आणि जर कांहीं उपा- यानें झोंप आली, तर ताप उतरून रोगी बरा होतो. अशा दोन तीन रोग्यांस अय्याची सुरावट ऐकवून औषधाशिवाय बरें केल्याचें ते सांगत. गाणे ऐकतां ऐकतांच रोग्यास झोंप लागे, व जागे झाल्यावर ते बरे होण्याच्या मार्गास लागत ! सारंग हा राग त्याचा विशेष असून, माध्यान्हीस भोजनापूर्वी त्यांत तो भ्रामरी सूर काढीत असे. तो तर ऐकण्यास अतिशय अद्भुत होता. शेजारच्या खोलीतील माणसास असें वाटावें कीं, हजारों भुंगे एका ठिकाणी जमून मोठा गोंगाट करीत आहेत ! परंतु तो इतका मधुर असे कीं, कांहीं झाले तरी तेथून हालण्याचें मनांत येत नसे. स्वतः गुरुवरअय्या यांचा मल्हार रागांत हातखंडा असे, असें पेरुअय्या सांगत असे. मुंबईतील धनिक गृहस्थांकडून सहाय्य मिळवावें म्हणून, पेरुअय्या राव-

  • साहेब मंडलिक यांचेकडे गेले. मंडलिकांनी ' आपणांस या कलेतील कांहींच

गम्य नाहीं, व फुरसत नाहीं, ' म्हणून सांगितलें, व कांही दक्षिणा द्यावयास काढली; परंतु ती नाकारून 'जेव्हां केव्हां थोडी फुरसत आपणांस असेल, तेव्हां तितक्याच वेळांत मी गाऊन दाखवीन, आपण माझा गुण पहावा, पैशाची प्रतिष्ठा नाही,' अशी त्यानें विनंति केली. मंडलिकांचा उद्योग व वक्त-