पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेरुअय्या; केरुनानांची गोष्ट. 1 शरिपणा हे आदर्शभूतच होते. 'संध्याकाळी संध्या करीत असतां फार तर १५ मिनिटें आपणांस देतां येतील, ' म्हणून त्यांनी सांगितले. तेव्हां कबूल करून पेरुअग्र्या ह्या वेळेस हजर झाले. त्यावेळी थोडक्यांत कांही म्हणून, 'इतकी मिनिटें झाली महाराज !' म्हणून त्यांनी सांगितले. पाहतात तो खरेंच! त्या- नंतर तेच सूर त्याच्या अर्ध्या वेळांत म्हणून, ' पांच मिनिटें झाली, पहा. ' म्हणून अय्यानें सांगितलें. त्यावरून कौतुक वाटून, मंडलिकांनी आणखी कांही वेळ गावयास सांगितले. सरतेशेवटी या कालज्ञानाचें, आणि त्याला अनुसरून वाटेल त्या साचांत सूर बसविणें व तसे प्रत्यक्ष गळ्यांतून काढून दाखविणे, या स्वरावरील प्रभुत्वाचें, त्यांना इतकें आश्चर्य वाटलें कीं, लागलीच उठून त्यांनी शंभर रुपये अय्याच्या पुढे ठेवले ! तसेंच एकदां ग्वाल्हेरचे प्रसिद्ध महमदखां यांच्या गाण्याचा जलसा झाला होता, त्यावेळी देखील अग्र्याच्या गाण्यानें त्यांस स्वतःसच चकीत केले. खां- साहेबांची मिजास व ऐट खूपच होती, व त्यावेळेस अनायास कोणी पंजाबांतले. प्रसिद्ध तबलजीखांही साथ करावयास होते. तेहि मोठे श्रीमान् व पिढीजाद धंदेवाले होते. त्यांच्या तवल्यास रेशमाच्या काढण्या आणि चांदीची हातोडी असा थाट असे. थोडा वेळ गायन झाल्यावर अण्णासाहेब यांनी पेरुअग्यास पुढें व्हावयास सांगितले. त्यावरून त्यानें खांसाहेबांस, म्हटलेली चीज पुन्हा कांही मिनिटांत ह्मणण्यास सांगितलें. अग्याचें हें असले ध्यान आणि एवढ्या समा- जांत टाकलेला प्रश्न, यामुळे खांसाहेब अर्थातच अतिशय चिडून गेले, आणि बरीच बाचाबाची झाली. सरतेशेवटीं तीच सुरावट खांसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे निर- निराळ्या वेळांत अय्यानें स्वतः म्हणून दाखविली ! तेव्हां दोन्हीहि 'खां'चा पुरा रेच उतरला. पेरुअय्या हें नांव चमत्कारिक असल्यामुळे त्यांस अण्णासाहेबांनी 'शंकरअय्या' असें नांव दिलें होतें, व त्याच नावांनें मंडळी त्यास हांक मारीत. पुढें याचे काय झालें वगैरे गोष्टींची कांहीच माहिती त्यांनी दिली नाही. बहुत- करून तो आकस्मिक कालवश झाला असावा, नाहींतर हें रत्न कोठें तरी खास चमकलें असतें. मुंबईस असतांना घडलेली एक गोष्ट त्यांच्या सांगण्यांत कोणापाशींही वारंवार येत असे. एकदां केरूनाना छत्रे हे मुंबईस आले होते. पुण्याहून मनुष्य आला म्हणजे तो यांचेच बि-हाडी यावयाचा; आणि नानासाहेबांचा व