पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. व यांचा अतिशय लोभ, म्हणून केरूनाना अण्णासाहेबांचेकडे उतरले होते. रात्री जेवणे खाणें झाल्यावर बैठक उठून गेली, आणि अण्णासाहेब यांनीहि आराम खुर्चीवर आंग टाकले. परंतु नाना हे आडवे झालेले उठून कांहीं तरी पुटपुटत फेऱ्या घालू लागले. त्यावर " नाना तुम्ही काय म्हणतां ? " म्हणून अण्णासाहेबांनीं प्रश्न केला. तेव्हां " मी विष्णु सहस्रनाम म्हणतो, " म्हणून नानांनी सांगितलें तें ऐकून अण्णासाहेबांस आश्चर्य वाटलें. कारण नाना हे नास्तिक म्हणून प्रसिद्ध होते. अतिशय आश्चर्यानें अण्णासाहे- बांनी विचारले, ' तर मग देव आहे असे मानतां तुम्हीं ? ' त्यावर गंभीर- पणानें नानांनी सांगितलें, “ खरें सांगूं तुला ? देव आहे किंवा नाहीं, या प्रश्नाचा विचार करावयास मला कधीं वेळच सांपडला नाहीं; आणि सारें . बाजूला ठेवून, केवळ त्याच प्रश्नाच्या मागे लागण्याची गरजही पण कधीं भासली · नाही. परंतु मी स्वभावतः गणिती मनुष्य आहे, तेव्हां मी असा हिशेब केला कीं, जर देव नसला, तर आपणावर कसलीही जबाबदारी नसल्यामुळे, आपल्या वेळेचे आपणच मालक आहों. तेव्हां चोवीस तासांतून पंधरावीस मिनिटें जर आपण गटारींत पैसा फेंकल्याप्रमाणे अगदी वांया घालविलीं, तरी आपल्याला कोण विचार- •णारा आहे ? परंतु जर देव असला, आणि आयुष्याबद्दल मनुष्य त्याला जवाब- दार असला, तर मात्र मेल्यावर तो 'आयुष्यांत माझ्याकरितां काय केलेंस ?” म्हणून मला विचारील; व त्यावेळेस जर कांही उत्तर देतां आलें नाहीं, तर माझी दशा कशी होईल ? त्यापेक्षां त्याच्या प्रीत्यर्थ म्हणून दहापंधरा मिनिटें रोज घालवावीत, म्हणजे जर तो असला, आणि त्यानें विचारलें, तर एवढे ठांसून सांगतां येईल की, ' दुसरें तर मी कांहीं केलें नाहीं, परंतु रोज पंधरा मिनिटें तुमच्या प्रीत्यर्थ खर्च केल्याखेरांज मी कधीं अन्नग्रहण केले नाहीं । ' आजीनें लहानपणीं मला तीन नियम सांगून ठेवले होते. विष्णुसहस्रनाम म्हणणे, शाळिग्रामास तुलसीदल वाहणें, आणि गंध लावणे; हे तीन नियम मी जसेच्या तसेच अजूनही पाळतों. जर देव नसेल, तर रोज पंधरा मिनिटें मी फुकट घालविली एवढाच अर्थ होईल, परंतु माझे नुकसान मात्र होणार नाहीं ! ” त्यावर, ‘ गंध लावणें व शालिग्रामास तुलसी वाहणे, हें प्रवास वगैरे अडचणीत कसें सावतें ? ' म्हणून विचारतां, नानांनी सांगितलें कीं, ' अडचणीच्या प्रसंगी त्यांची प्रत्यक्ष सोय नसेल, तर मी निदान कपाळावरून बोट तरी फिरवितों; आणि