पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केरूनानांची गोष्ट, व मुंबईतील इतर गोष्टी. 1 ६३ ' तुळशी वाहिल्याची भावना करून, ' मी तुला तुळशी वाहिल्या, ' असें तोंडाने तरी म्हणतों; म्हणजे माझ्याकडे वंचकता येत नाहीं ! " या गोष्टीचें तात्पर्य प्रत्येकानें लक्षांत ठेवण्यासारखे आहे. इतक्या मोठ्या प्रश्नाचा इतक्या थोडक्यांत सुंदर निकाल लावणारी अशी शहाणपणाची विचारसरणी दुसऱ्या कोठेही सांपडावयाची नाही. सुशिक्षित म्हणविणाऱ्या मोठमोठ्या विद्वानांनी, विश्वाचीं कोडीं उकलण्याचा अट्टाहास करीत असतांही, नानांचें अनुकरण करणें यॊग्य आहे, म्हणून ही गोष्ट अण्णासाहेब कोणालाही वारंवार सांगत असत. यावेळीं घडलेल्या मुंबईतील इतरही पुष्कळ गोष्टी, म्हणजे लीवॉर्नर साहेब यांस एका पार्शी पोरानें कसें ठोकलें होतें, आणि नानामोरू या प्रसिद्ध कडक न्यायमूर्तीनें लीवॉर्नर यांस आरोपीच्या पिंजऱ्यांत घालून दहा रुपये दंड कसा केला होता, अथवा शंकर पांडुरंग पंडित यांच्या पोरकटपणामुळे ऐन दिवा- ळीच्या दिवशी त्यांची कशी फजिती झाली, वगैरे शेंकडों मनोरंजक हकीगती ऐकावयास येत; परंतु अण्णासाहेबांच्या चरित्राशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नस- ल्यामुळे, त्या येथे सांगत न बसतां, सालरजंगप्रकरणाच्या मनोरंजक हकीगती- · कडे वळूं. CHAK