पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंगाचा खेळ, आणि अण्णासाहेबांची परिक्षा. ६५ मंडळींना हैद्राबादेस ठाणें देऊन वसविलें होतें. तेथील सर्व कारवाई भाऊ निरुळकर यानें करावी, आणि सालरजंगाच्या भेटीची वगैरे दरबारी कामें भिकाजी- पंत देशपांड्यानें आटोपावी, अशी योजना केली होती. कोणच्याही तऱ्हेची बातमी ही पोष्टानें न पाठवितां स्वतंत्र माणसांचीच डाक ठेवली होती. पत्राची पाँच अथवा काडीत लिहिण्याजोगता किरकोळ मजकूर असला, तरी तो काडी- तून अगर पत्रांतून न जातां, रजिष्टर पत्राने पाठवीत असत. या कामाकरितां उत्तरहिंदुस्तानांतील संस्थानांतील कांही श्रीमंत गृहस्थही हाती घेतले होते. बरेच दिवस प्रयत्न केल्यावर प्रकरण रंगास आलें, आणि सालरजंगही त्यांस सामील झाला. असे ठरलें कीं, हैद्राबादेस एक भली थोरली बँक काढून दहा बारा कोटींचे कर्ज तिच्यामार्फत निजामसरकारास द्यावें, आणि त्याच्या बदल्यांत, वऱ्हाडचा कारभार अण्णासाहेबांनी आपल्याकडे घ्यावा. अर्थात जरी राजकीय धोरणें गुप्त असली तरी, निजाम सरकार कांहीं तरी मोठें कर्ज काढण्याचा विचार करीत आहे, ही गोष्ट चोहीकडे झाल्याखेरीज राहिली नाहीं; व एवढे कर्ज पुरविण्यास तयार असलेली कांही माणसेही पुढे आलीं. सालरजंगाची मुख्य अट अशी होती कीं, या कर्जास ब्रिटिश सिक्युरिटी अथवा कोणत्याच तऱ्हेची ब्रिटिश मध्यस्थी नको. ही अट पुरी करणे, इतर पोटभरूंना शक्य नसल्यामुळे अण्णासाहेबांचाच हेतु सिद्धीस गेला, आणि त्याप्रमाणे बँक काढण्याची खटपट सुरू झाली. तेवढ्याकरितां इमारत घेऊन रंग वगैरेही नीट देणें चाललें होतें, असे त्यांनी सांगितले. परंतु अण्णासाहेब हे कोणी सरदार अगर संस्थानिक नसल्यानें, एका तरुण हायकोर्ट वकीलावर कितपत भरंवसा ठेवावा, आणि त्याच्या नादी लागावें, याचा उमज सालर- जंगास पडेना. तेव्हां हा मनुष्य उगीच थापा देतो, अथवा त्याची पतच तेवढा आहे, याची परीक्षा करण्याकरतां सालरजंगानें एक दिवस निरनिराळ्या खटाटोप्यांच्या कारकुनांना बोलाविले, आणि सवाल टाकला की, 'बँकेचें व्हाव- याचें तें होईल, परंतु कांही निकडीच्या कामाकरितां सरकारला आतांच्या आतां २ कोट रुपये हवे आहेत; तेव्हां ब्रिटिश सिक्युरिटीवांचून, हे तुम्ही कोणी देऊं शकाल काय ? " त्यावर लोकांना मोठाच विचार पडला, व कोणी 'आम्ही आमच्या मालकांस विचारतों' म्हणून, कोणी 'ब्रिटिश ५