पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणखी एक परीक्षा. ६७ इतकें झालें तरीही सालरजंगास पुरती खात्री वाटेना. म्हणून त्यानें आपल्या हातानें एक फारशी पत्र लिहून, त्याचा सेक्रेटरी भिकाजी रुस्तुम यास मुंबईस अनपेक्षित पाठविले, आणि त्यास बजावून ठेवले की, 'जर सर्व तऱ्हेनें अण्णासाहेब पसंतीस उतरतील, तरच हैं पत्र अण्णासाहेबांस द्या, नाहीं तर देऊं नका. ' अण्णासाहेबांस या गोष्टीची वार्ताही नव्हती. सकाळी दहा वाज- ण्याच्या सुमारास ते आरामखुचीवर वर्तमानपत्र वाचीत पडले होते. कर्मधर्म- संयोगानें,हैद्राबादेस कामाकरतां गेलेला यांचा एक इसम त्याचवेळीं बोरीबंदरवर गेला होता. भिकाजी रुस्तुम याचा स्पेशल डवा पाहून त्यास सालरजंगच आला असे वाटलें, व तसाच व्हिक्टोरिया करून अण्णासाहेबांकडे येऊन त्यानें त्यांस ही बातमी सांगितली. तेव्हां ज्याअर्थी हा अनपेक्षित आला आहे, त्याअर्थी घरी भेटावयास येईल, असा तर्क करून अण्णासाहेव त्याच्या स्वागताच्या तया- रास लागले. मुरारजींकडून त्यांचा दिवाणखाना त्यांनी मागून घेतला, व त्यांसही कचेरींत न जातां घरीं राहण्यास सांगितले. त्यांची गाडी दारासमोर उभीच होती; आणि दुसऱ्याही दोन अशाच उभ्या करून ठेवल्या. जवळ तर नेहमीं- प्रमाणे कांहींच शिल्लक नव्हते, म्हणून शेजारच्या पानवाल्याकडून ३०० रु. घेतले, आणि अत्तर गुलाब वगैरे पानसुपारीच्या तयारीस माणसें पिटाळली. इतकें होत आहे तों, भिकाजी रुस्तुम याजकडून निरोप आला कीं, " मी भेटावयास आलो आहे, केव्हां येऊं, तें कळवावें" तेव्हां-'आतांच या, मी घरींच राहतों, ' असा यांनी निरोप पाठविला, आणि कांहीं बड्या मंडळीसही बोला- चलें. थोड्याच वेळानें भिकाजी रुस्तुम येऊन पोहोचले. त्यांस समोरील बाजूनेंच दिवाणखान्यांत नेऊन मुरारजी शेट J. P. वगैरेंचा परिचय करून दिला. भिकाजींस असें वाटलें होतें कीं, आपला निरोप आल्यावर लागलीच अण्णासाहेब भेटण्यास तयार होणार नाहीत, परंतु त्यांनी लागलीच बोला- विलें, तेव्हां हा सर्व त्यांचा नेहमींचाच इतमाम असेल असे वाटून, व J. P. सारखीं बडीं माणसें तेथें पाहून तो तर गारच होऊन गेला ! नंतर दोघांचें एकीकडे जाऊन वरेंच भाषण झाले. त्याच्या योगानें तर स्वारी चारी मुंड्या चीत होऊन गारेगार होऊन गेली; व तो एवढा भाळून गेला की, त्यानें तें पत्र अण्णासाहेबांस दिलें; इतकेंच नाहीं, तर अण्णासाहेबांच्या विनंतीवरून स्वतः आपल्या हातानें त्याचें इंग्रजी भाषांतर लिहून दिलें ! त्यानंतर सर्व