पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ सालरजंग प्रकरण व मद्रास. मंडळींना दरवारी थाटाची पानसुपारी होऊन, अतिशय प्रसन्न चित्तानें हे प्रति- निधि हैद्राबादेस परतले. या सर्व गोष्टींमुळे अण्णासाहेबांचा मोठाच लौकिक होऊन इतरही मोठ- मोठी कामे त्यांच्याकडे येऊं लागली होती. मद्रास इलाख्यांत करवट म्हणून एक शहर आहे, तेथील व्यंकट परमाळ नांवाच्या राजानेही अशाच कांही कामाकरितां अण्णासाहेबांकडे संधान लावलें. हें संस्थान सुमारें ६० लक्षांचें असून राजाही मोठा चांगला आणि धर्मात्मा होता. हैद्राबादेस बँक उघडली म्हणजे सर्व करार मदार होऊन, बरोबरीच्या नात्यानें अण्णासाहेब व सालर- जंग यांनी भेटावें असे ठरलें होतें. त्या पूर्वी हें मद्रासचें काम आणि दुसरीं कांहीं किरकोळ कामें पक्की करावीं, आणि सर्व मिळून एकदमच कामास सुरुवात करावी, अशा इराद्यानें त्यांनी स्वतः मद्रासेस जावयाचे ठरविलें. आपणास मद्रासला जास्त वेळ लागेल, अशी कल्पना नसल्यामुळे त्यांनी अर्थातच मागील अनेक कारभारांची व्यवस्था लावून ठेवली नाही. एकाद्या कामाकरितां सहज गांवी जावें, त्याचप्रमाणें ते याही कामास निघाले. त्यांना भेटण्याची सालर- जंगास उत्कंठा असल्यामुळे, आणि यांनी आधी भेटीस जाण्याचें नाकारल्यामुळे, 'मद्रासेस जातांना गाणगापूर स्टेशनवर आपण भेटतों,' म्हणून सालरजंगानें कळ- विलें होतें. तेव्हां दिवस व गाडी नक्की करून वाटेंत पुण्यास एकदोन कामें करावीं, आणि आळंदीस स्वामींचें दर्शन घेऊन पुढे जावें, अशा इराद्यानें ता. ९ आक्टोबर १८८० शनिवार, या दिवशी संध्याकाळी अण्णासाहेब मुंबईहून निघाले, ते रात्री ९ वाजतां पुण्यास येऊन पोहोंवले. बरोबरीच्या मंडळीची जेवणाखाणाची व्यवस्था लावून स्वतः थोडेंसें दूध घेऊन त्यांनी आंग टाकले. मोठ्या पहाटें उठून गणपतरावांना बरोबर घेऊन आळंदीस जावें, असा त्यांचा ऋगणपतरावः - गणपतराव आठवले:-फार पूर्वी, अण्णासाहेब कोठेही बाहेर निघाले, म्हणजे हे त्यांच्याबरोबर शरीररक्षकासारखे असत. महाराजांच्या कडे आळंदीस जावयाचें म्हणजे तर यांनाच बरोबर घेऊन जावयाचें, असा अण्णासाहेबांचा नेम असे. ९७ च्या प्लेगांत हे वारले. यांचे नातू नरहरपंत आठवले पदवीधर असून समर्थ विद्यालयांत काम करीत आहेत.