पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मद्रासेस निघण्या पूर्वीची हकीगत. विचार होता. सकाळी त्याप्रमाणे करावें म्हणून मुखमार्जन करतात, तों+गणेश- भट्टांनी येऊन सांगितले की, कृष्णाजीपंत रानडे पहाटें चार वाजतां नदीवरून येतांना आले होते, च त्यांनी आळंदीचे स्वामी येथे आले आहेत, असे सांगि- तलें. तेव्हां आयतेंच काम झाले, असे वाटून अण्णासाहेबांस बरें वाटलें, परंतु जास्त कांहीं कल्पना डोक्यांत आली नाहीं. गणेशभट्टांस कांहीं मोत्यांचा व्यव हार करावयाचा होता, व त्यासंबंधानें, कृष्णाजीपंत रानडे यांच्याशी त्यांचें भाषण झालें होतें. भट्ट हे पहाटें चार वाजतां नानाच्या हौदावर नेहमीप्रमाणें आंघोळ करून आले, आणि धोतरें वगैरे वाळत घालत होते. वाळत घालतां घालतां त्यांनी मार्गे पाहिलें, तो कृष्णाजीपंत उभे. तेव्हां 'अरे कृष्णाजीपंत, या वेळेस तूं कोणीकडे ? ' म्हणून ते उद्गारले. त्यावर ' मी नदीवर गेलों होतों, परंतु येतांना मोत्यांची आठवण मला झाली, व तुम्हांस घ्यावयाची असतील तर सकाळी मजकडे या, म्हणून सांगावें, एवढ्याकरितां मी इकडे वळलों, ' एवढे म्हणून कृष्णाजीपंत जावयास निघाले, परंतु तितक्यांत सहज आठवण झाल्यासारखं करून म्हणाले, 'हो, आणखी एक गोष्ट सांगावयाची आहे; आळंदीचे स्वामी येथें आले आहेत, बरें कां, ' इतकें बोलून व सकाळी यावयास सांगून कृष्णाजीपंत परत गेले. उजाडल्यावर गणेशभट्ट कृष्णाजीपंता- कडे जाऊन म्हणूं लागले कीं, 'पहाटें तूं मोत्यांचे काय म्हणत होतास ?' तेव्हां आश्चर्य वाटून कृष्णाजीपंत म्हणाले, 'हे काय ? मी केव्हां काय म्हणालों ? तुम्हांस घ्यावयाची असतील तर आपण जाऊं, ' त्यावर भट्टांनी सारा पाढा वाचला. तेव्हां अधिकच विस्मित होऊन कृष्णाजीपंतांनी सांगितले की, आपण केव्हांही नदीवर स्नानास जात नाहीं, व आजही गेलो नव्हतों, इतकेंच तर काय, पण आळंदीच्या स्वामीची व आपली मुळींच ओळख नसून, त्यांना काळेंगोरें पाहि- लेही नाहीं! शेवटी बरीच बोलाचाली होऊन, मोत्यांचा विषय तितकाच राहिला, + गणेश भट्टः – एक भिक्षुकब्राह्मणाचें कुटुंब अण्णासाहेब यांच्या मातो श्रींनी सांभाळिलें होतें. अखेरपर्यंत त्यांतील हे भटजी अण्णासाहेबांवरच अवलंबून होते. यांच्या दुसऱ्याच्या कामास धांवून जाण्याची वगैरे अण्णासाहेब नेहमीं तारीफ करीत, व जटायूची त्यांना उपमा देत. यांना पोरबाळ कांहीं नसल्याकारणाने यांची उत्तरक्रिया देखील अण्णासाहेब यांचे हातूनच झाली.