पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मद्रासचें राजकारण. ७१ अभ्यास यांत घालविला, असे मानण्यास जागा आहे. काम रेंगाळण्याचे कारण असें कीं, दरवारांत या कारस्थानाच्या विरुद्ध असलेली एक बाजू होती, आणि तिच्यांतच राजपुत्राचा इंग्रजी शिक्षक ( Tutor) होता. या कामावर राज- पुत्राची सही असल्याशिवाय तें पुरे होत नव्हतें, आणि राजपुत्र तर शिक्ष- काच्या हातामध्यें होता, त्याला तो सही करूं देईना. यावर तें काम अडून राहिलें. दोनही पक्षांची कांही काळ मोठी झटापट झाली असावी. प्रतिपक्षानें यांच्या कामांत अडथळा आणण्याकरितां अनेक खटपटी केल्या, त्यांतच एकदां यांस एका खटल्यांत गुंतवून कोर्टापुढे ओढण्याचा, व एकदां गोळी घालून मार ण्याचा केलेला प्रयत्न, हे प्रमुख होत. एकदां हे शौचास गेले असतां दुरून त्यांच्यावर गोळी घालण्यांत आली; परंतु सुदैवाने ती डोक्यास न लागतां केसांस चाटून गेली. तसेच एकदां संध्याकाळी रेल्वेच्या बाजूनें फिरत असतां एक वासरूं रूळावर उभें होतें; आणि समोरून मोठ्या वेगानें गाडी येत होती. आवाजासरशी तें दूर व्हावयाचें, परंतु तितक्यांत पाय अडखळून खडी- वरच तें वासरूं पडलें, आणि पुन्हा धडपडून उभे राहणार, तोंच गाडी जवळ येऊन पोहोंचली. आतां हें वासरूं खास मरणार असा विचार येऊन, त्यासरशीच अण्णासाहेब यांनी तारेवरून ताड्दशीं उडी मारली, आणि त्या वासरास उच- लून पलीकडे उडी मारतात, तोंच धाड् धाड् करीत त्या जागेवरून एंजिन निघून गेलें, डोळ्याचें पातें लवण्याइतकाही उशीर झाला असता, तर दोघांचाही चूर होऊन गेला असता. त्या गाडीचा गार्ड हा प्रतिपक्षाचा असल्यामुळे अण्णा- साहेबांस अडकविण्यास या संधीचा चांगला उपयोग होईल असें डोक्यांत येऊन, या कृत्याचें कौतुक न करतां उलट त्यांच्यावर ट्रेसपासची फिर्याद करण्यांत आली । त्यावरून पुढे बराच खटला चालून शेवटी त्यांतून अण्णासाहेब निर्दोष बाहेर पडले. अशा तऱ्हेच्या अनेक कटकटी झाल्यावर अखेरीस यांचें काम साधण्याची संधी आली. त्या इंग्रजी शिक्षकाचा मुलगा कांहीं रोगानें आजारी पडला, व आतां वाचत नाहीं, असें दिसूं लागले. डॉक्टर या नात्यानें अण्णा- साहेब यांची अतिशय प्रसिद्धी असल्यामुळे, नाक मुठीत धरून त्याला यांच्या- कडे यावें लागले. तेव्हां 'आपण औषध देतों, व मुलगाही वांचेल; परंतु सही झाली पाहिजे, ' असे अण्णासाहेबांनी सांगितले, व त्याप्रमाणे सर्व घडून आलें. आतां ही सर्व प्रकरणें थडस लागली असे वाटू लागले, तोंच एकाएकी हैद्राबादेहून