पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. सालरजंगाच्या आकस्मिक मृत्यूची तार येऊन पोहोंचली ! सालरजंग कलि- ज्याच्या विकाराने मृत्युमुखी पडला असो, अथवा कांही लोक म्हणतात त्या- प्रमाणें विषप्रयोगास बळी पडला असो, त्याच्या मृत्यूनें एवढ्या मोठ्या खटा- टोपाचा पाया नाहींसा होऊन सारीच इमारत ढांसळून पडली ! तरीपण हिंमत न सोडतां, मद्रासचें काम उरकण्याच्या मागे ते लागले, व त्यांतून त्यांनी पुन्हा कांही तरी उभारणी केली असती, परंतु यांचा हा प्रयत्न रंगास येतो न येतो तोंच, व्यंकट परमाळही तसाच मृत्युमुखी पडला, व त्यामुळे तेही कारस्थान मोडून पडलें ! ७२ अशा स्थितीत, कांही काळ, कांहींच न करितां मद्रासेंतच त्यांनी एकांतपणें घालविला असल्यास नवल नाही. देवधर्मावर यांची आधीपासून श्रद्धा होतीच, आणि इंग्रेजी विद्येच्या संस्कारानें जो चौकसपणा उत्पन्न व्हावयाचा तोही यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला होता. कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करावयाची, हा तर यांचा स्वभावच होता; आणि बुद्धि अतिशय सूक्ष्म व सर्वगामी असल्यामुळे, विचाराच्या योगानें याविषयीं जें कांही समाधान माणसास यावयाचें, तें त्यांस आले असले पाहिजे. त्याच्या जोडीस योगशास्त्र, वेदमार्ग, अतींद्रिय अस्तित्व, वगैरे गोष्टींची प्रत्यक्षता श्रीमहाराज, तात्यासाहेब, यांच्या सहवासानें आणि दुसऱ्याही अनेक लोकांच्या प्रसंगानें यांस झाली होती. परंतु त्यायोगानें आपला उद्योग सोडून एकांतिक सुखांत पडून राहण्याची त्यांना कधींही इच्छा झाली नाही. उलट, सर्वांची साधेल तितकी जोड आपल्या प्रय- त्नांस देऊन तो अधिक यशस्वी करूं, अशी त्यांची उमेद होती; आणि केवळ मानवी कर्तृत्वाची रग जास्त असल्यामुळे, प्रयत्नवाद कितीही खरा असला तरी मनुष्याच्या जीवनाची आणि यच्च यावत् विश्वाच्या व्यापाराची सर्व सूत्रे हातांत ठेवून, त्यांच्यावर स्वतःच्या तंत्राने हुकमत चालविणारा कर्तुमकर्तुं अन्यथाकर्तुं कोणी तरी ईश्वर आहे, असे त्यांना जिवंतपणें वाटत नव्हतें. मनुष्य- प्रयत्नांच्या सर्व अभिमानास लाजविणारी मृत्यु ही एक जगांत बिनतोड गोष्ट आहे, व त्यानें अशा रीतीनें ऐनवेळी हात दाखविल्यामुळे, मनुष्यप्रयत्नाचा पंगूपणा, आणि हजारों युक्तिवादांस हार न जाणारें विश्वनियामकाचें अस्तित्व यांचा कांहीं विलक्षण बोध त्यांच्या अंतःकरणांत झाला असावा. तेव्हां अर्थातच, त्यांच्या पद्धतीप्रमाणे, हें कोर्डे सोडविणे हेच अधिक महत्वाचें होऊन बसलें. परंतु