पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्याचें परिवर्तन. विशेष लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट हीच कीं, कोणत्याही तऱ्हेच्या मनोदुर्बलतेमुळें अथवा व्यक्तिविषयक कारणामुळे, या कोड्याचे महत्त्व त्यांस वाटले नाहीं. देश आणि देशबांधव यांच्यापुढे व्यक्तीचें-- स्वतःचे -- महत्त्व त्यांस कधी वाटलेंच नाहीं. ७३ येथून पुढे, मद्रासेस आणि इकडे आल्यानंतरही त्यांचें जे आयुष्य गेलें, ·त्याच्या परिवर्तनाचें असे कारण आहे. प्रयत्नांत अपयश आल्यामुळे त्यांची जी भयंकर निराशा झाली, त्या योगानें हिंदुस्तानच्या भवितव्यतेविषयीं निराश होऊन, त्यांनी ' हरि हरि' करीत देहसार्थक केलें, अशी सामान्य समजूत आहे. परंतु त्यांचे स्वतःचे सर्व प्रसंगांतले उद्गार आणि उपदेशांची सरणी यांचा समन्वय केला, तर ही समजूत अतीशय अडाणीपणाची, व आंधळेपणाची आहे असे स्पष्ट दिसतें. नंतरही ह्मणजे सर्व चळवळी सोडून देऊन ते गेंड्याप्रमाणे एक- टेच रमत होते, असे नाहीं; इतकेंच कीं, मुद्दाम होऊन त्यांनी कधीं कांहीं केले, अथवा कोणास करावयास सांगितले, असे झाले नाहीं. शिशुपाल-वक्र- दंतांस मारल्यावर धनुष्याची प्रत्यंचा कायमचीच उतरून ठेवणाऱ्या श्रीकृष्णांनी पुढे भारतांत जे काम केलें, तेंच यापुढील आयुष्यांत अण्णासाहेबांनी केलेंसे 'दिसलें, परंतु ह्याच्या जोडीस खरोखर जे काम केलें, तें दिसत नसल्यामुळे, अगर त्याच्या उपयुक्ततेची व आवश्यकतेची कल्पनाच नसल्यामुळे, त्यांनी प्रत्यंचा उतरून ठेवली एवढे मात्र दिसतें, व त्यामुळे त्याविषय अनेक तर्क उत्पन्न होतात. एवढ्या मोठ्या विद्वान् माणसानें एकाद्या देवलस्या म्हातारीप्रमाणे आपल्या कार्याची प्रत्यक्ष दिशा बदलून, तपश्चर्येवर भर द्यावा, हें कोणासही कसेंसेंच वाटतें. परंतु यांतच अण्णासाहेबांचें खरें मोठेपण आणि अलौकिकत्व आहे. परंतु जेथें देवावरच विश्वास नाहीं; व त्याचें अस्तित्व ह्मणजे एक केवळ औपचारिक अथवा पुस्तकी बाब होऊन बसली आहे, तेथें असें व्हावयाचेंच, व याविषयी आणि त्यांच्या पुढील कार्याविषयीं केव्हांही दुमत रहावयाचेंच. त्या कार्याच्या स्वरूपाविषयी कितीही वाद असला, अथवा तें व्यर्थ ह्मणून वाटत असले, तरी देखील एक गोष्ट सर्वांसच कबूल करणे भाग आहे. •ती ही कीं, निराशेमुळे प्रयत्न-हत होण्याचा कमीपणा, अथवा स्वतःच्या पारमार्थिक कल्याणास लागण्याचा स्वार्थीपणा, हे दोष त्यांच्या अंगीं लागत नसल्यामुळे, वाटेल त्या तावांतूनही जसेच्या तसें बाहेर निघणान्या सोन्याप्रमाणे