पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ सालरजंग प्रकरण व मद्रास. जगाच्या इतिहासांत ही एक अद्भुत विभूती होऊन गेली. पुढील ३६ वर्षां- चा कार्यक्रम हाही साधनस्वरूपच असून, त्यांच्या मूळच्या ध्येयाचेंच तें एक साधन होतें, हे लक्षांत ठेवलें ह्मणजे त्यांच्या आयुष्याचें कोर्डे आपल्यापुरतें तरी उकलून, स्वतःपुरती तरी आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्यास त्याचा उपयोग होतो. ध्येय जरी तेंच राहिले, तरी ध्येयसाधनांत हा असा विलक्षण फरक कसा झाला, याचा संगतवार इतिहास तर काय, परंतु त्रोटक माहि- तीहि मिळणे अशक्य आहे. (² मी स्वतः दोन चार वेळां हा विषय काढला होता, व खुद्द त्यांनाच • वारंवार अडथळे आल्यामुळे तुम्हांस वाईट वाटले नाहीं कां ? ' म्हणून विचारलें होतें. त्यावर “छे, मुळींच नाहीं, कारण त्या वेळी हिंमत मोठी होती, या उद्योगांत नाही, तर त्या उद्योगांत यश मिळेल, हा नाहीं साधला तर दुसरा कोणता तरी साधेल, असे वाटत असे. " तर मग तुमच्या साधनांची दिशा कां बदलली?" असे विचारल्यावरून, ' तशा रीतीनें हें काम होणार नाही, असे वाटल्यावरून, ' असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्याचप्रमाणे, ' मी पुढे यत्न केला असता, तर कदाचित् यश आलेंही असतें, परंतु झालें हें ठीक झाले. आतां जो देशाचा भाग्योदय होईल, तो खरा व चिरकालिक होईल; तें केवळ व्यक्तीच्या महत्त्वापुरतें झालें असतें, ' असे उद्गार त्यांनी कैक वेळां काढलेले पुष्कळांच्या ऐकण्यांत आहेत. ही खात्री त्यांची कशी झाली असावी, हैं कळण्यास मोठेंसें साधन नाहीं, तरीपण ती मद्रासेसच झाली असावी, एवढें खास. मी स्वतः त्यांना निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या रीतीनें प्रश्न केले होते, त्यांतील तीन चार वेळांची उत्तरें माझ्या चांगली लक्षांत आहेत. एकदा कांही कारणावरून ते जरा रागावले होते. त्यांच्या शांत स्वभावाची घडी बिघडून, ते मनापासून रागावलेले फक्त एक दोन ठराविक प्रसंगीच दिसत. पंतांनी म्हटल्याप्रमाणे, 'गतसद्वृत्त' मुलांना पाहून, त्यांचें 'हितरत गुरुमन' कळकळे, तेव्हां ते फार रागावल्यासारखे दिसत. तसेंच कोणी त्यांची सर्व कामें आटोपल्याखेरीज खाण्याची गोष्ट काढली, म्हणजे त्यांस मनापासून राग येई, व ' खाण्याकरतांच माझा जन्म आहे कां ? ' असें विचारीत ! अशाच कारणानें एकदां मजवर रागावून 'फराळ करीत नाहीं, ' म्हणून सांगत असतां ते म्हणाले कीं ' माझ्यापाशीं गोडवें गोडवें काम नाहीं;... अशा रीतीनें