पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा परिवर्तनाचें कारण. काम ( देशाचें ) होणार नाही, अशी खात्री एकदां माझी झाली, तेव्हांपासून मी स्वतः कोणासही तसे करावयास सांगितलें नाहीं, ' असे ते म्हणाले; व जें त्यांस करावेसे वाटलें, तो ' कारखाना आज ३६ वर्षे सुरू आहे,' असे त्यांनी सांगितलॆ. त्याचप्रमाणें एकदां पूजेकरितां महाराजांच्या तसबिरीपाशी * उभे असतां त्यांच्या आयुष्यांतील या स्थित्यंतराचाच विषय निघाला होता. तेव्हां ते चटकन् बोलून गेले - ' अरे, सर्व मांडणी दाखविली ना महाराजांनी!' इतकेंच बोलून भानावर आल्यासारखे होऊन त्यांनी तितक्यांतच दुसरा विषय सुरू केला. प्रसंगानें याच ठिकाणी त्यांच्याविषयीं एक गैरसमज दूर करावासा वाटतो.. कधीहि कोणास हताश करावयाचें नाहीं, नाउमेदांचे किंवा असलेच असंगल शब्द स्वतःच्या तोंडून काढावयाचे नाहीत, कोणी कसाही मनुष्य आला, तरी त्याला न सोडतां, भरपूर उमेद देऊन, असेल तेथूनच इष्ट दिशेकडे वळवा- वयाचा, व स्वतः आपण कोणी विशेष आहों, अशा अधिकारपणाचा वास देखील येणार नाही, इतक्या सहज तें करावयाचें, असा त्यांचा धारा असे. किंबहुना निवळ अकल्याणकारक अशा गोष्टी खेरीजकरून, इतर केव्हांही कोणा- च्याही बाबतींत, स्वतःसंबंधानें अथवा दुसऱ्या संबंधानेंहि 'न' कार उच्चारण्याचा त्यांच्या वाणस विटाळच होता. त्यामुळे त्यांच्याकडे देशाच्या भवितव्यतेची कित्येक लोक चर्चाही करीत, व त्यांस भविष्यज्ञान असेल, अशा आशयानें कांहीं तरी त्यांच्या तोंडून काढून घेण्याचा प्रयत्न करीत. परंतु अशा प्रकारें प्रकट होणें हें त्यांच्या अनुपमेय निरहंकारतेस असाध्य असल्यामुळे, अशा मंड- ७५

  • श्रीमंत बाबासाहेब सांगलीकर यांनी श्री. महाराजांचे फोटो काढविले होते.

ती हकीकत परिशिष्टांत आहे. त्यांतील एक लहान फोटो दिवाणखान्यांत खुर्च्याचे खोलीचे दाराशी कोपऱ्यांत टांगलेला असे. अण्णासाहेब यांचें मुख्य दैवत काय तें हैं. पुढे महाराजांच्या लहान मोठ्या पुष्कळ तसविरी त्यांचेकडे आल्या, तरी अखेरपर्यंत त्यांची पूजेची हीच मुख्य तसवीर असे. घरच्या देवांची पूजा स्वतः ते कधींच करीत नसत. फक्त, स्नान झाल्यावर त्यांस भस्म व वेल वहात. यांचें पूजेचें अवडंबर असें कधींच नसे. थोडेसें भस्म व बेल येवढे असलें म्हणजे त्यांस पुरे. ही पूजासामग्री घेऊन वर सांगितलेल्या तसबिरीजवळ ते उभे रहात, व पठणद्वारा तासतास पूजा करीत.