पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ सालरजंग प्रकरण व मद्रास. •ळींत भविष्यवाणी तर त्यांनी कघींच काढली नाहीं, उलट त्यांच्या ज्या कल्पना असत, त्यांच्याच अनुरोधाने त्यांस हिंमत देऊन, " हो हो, खास असेच महाराज करतील, " अशा आश्वासनानें “ त्यांतल्यात्यांत योग्य त्या "दिशेने काम करा, " म्हणून सुचवीत. त्यामुळे देशाच्या भवितव्यतेविषयीं अण्णा- साहेबांनी " अमुक भविष्य केले आहे, " " तमुक भविष्य केले आहे, " अशा पुष्कळ आख्याइका ऐकूं येत. परंतु त्यांत खरोखर तथ्य काय आहे, हे त्यांच्या वरील स्वभाववर्णनावरून लक्षांत येईल. अशाच एका आख्यायिकेवरून, म्हणजे १९०७ साली “ अजून १३ वर्षे अवकाश आहे, " अशा त्यांनी काढलेल्या उद्गारांवरून, १९१८ किंवा १९१९ सालाच्या सुमारास हिंदुस्तान स्वतंत्र होणार, असा कित्येक लोकांस भ्रम होता. मी एकदां हाच प्रश्न त्यांना केला होता. त्यावेळी लढाई सुरू असून तिच्याविषयीं अण्णासाहेबांस फार कळकळ आहे, व आतां हिंदुस्तान स्वतंत्र होईल, असे कित्येकांस वाटे. तेव्हां "लढा- ईंत तुमचा जीव खरीखरीच गुंतला आहे कां ? व या लढाईनें आम्ही खरेच स्वतंत्र होणार कां?’ म्हणून मीं स्पष्ठ विचारले. तेव्हां ते असें म्हणाले, 'मला त्यांत कांहींच महत्त्व नाहीं, काय व्हावयाचे आहे, हें मला ठाऊक आहे; तरी पण एक गोष्ट खरी कीं, हिंदुस्थानच्या कल्याणाकरितां हें युद्ध सुरूं झालें आहे, व हळू हळू सर्व राष्ट्रांची डोकीं या चरकास लागतील; व कांहीही झाले तरी, इंग्रज लोकांच्या इभ्रतीस यामुळे कमीपणा येईल. ' तेव्हां, 'तुम्ही लोकांशीं या बाबतीत अशा तऱ्हेनें कां बोलतां ? ' असा मुद्दा पुढे आला. त्यावर, 'तुम्ही लोक इतके गचाळ आहां कीं, दुसऱ्या तऱ्हेनें वागावयाची सोयच नाहीं; ‘ उद्यां होईल,' असे जर म्हटले तर हातपाय ताणून पडाल, आणि 'परवां होईल,' म्हणून सांगितलें, तर छाती फुटून मरून जाल, अगर बेताल व्हाल, एकूण कर्माच्या नांवानें बोंब, आणि व्हावयास तर पाहिजे कोणीकडून तरी 'कर्म, ' असे त्यांनी सांगितले. त्यावर मी त्यांस विचारले की "सांगावयाचें नसेल तर सांगूं नका; पण असे चक्रांत टाकूं नका महाराजांनी तुह्मांस तर हें दाखविलें आहे ना ? " ते म्हणाले, " हो. " पुन्हा मी विचारलें " तर मग केव्हां होणार आहे ? " त्यावर “ मी सांगत नाहीं, " असे त्यांनी स्पष्ट सांगितलें. मी १९२० सालाच्या कल्पनेचा उल्लेख केल्यावरून ते इतकेंच म्हणाले की, "चक्रगति पालटली, एवढे मात्र खरें; परंतु तेवढ्यावरून एकदम