पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/174

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. योग न व्हावा म्हणून एकच खोंड तो तीन वर्षांवर कामी आणीत नाही. त्या शेताच्या निरनिराळ्या भागांत आह्मी फिरून आलों; व शेतकीची अवजारे वगैरे ठेवलेली 'शेड्स'-छपरें–पाहिली; आणि सर्व अवजारे, गाड्या, घोडे व एक — ऑइल एन्जिन' वगैरे सुद्धां, अशा त-हेची शेतवाडी नवी चालू करण्याला, एकंदर खर्च काय पडेल, ह्मणून त्याला आह्मी विचारिलें. तेव्हां सुमारे अडीचशे एकरांच्या शेतवाडीला घोड्यांशिवाय तीनशे व घोड्यांसुद्धां पांचशे पौंड ( सुमारे चार हजार पांचशे व साडेसात हजार रुपये ) खर्च यावा, असें त्याने सांगितले. यापूर्वी आमी दुसऱ्या एका शेतकऱ्याला हाच प्रश्न केला होता. त्याने सुमारे सहाशे एकरांची नवी शेतवाडी चालू करण्याला, नऊशें पासून हजार पौंड ( साडेतेरा ते पंधरा हजार रुपये)खर्च पडेल, असे सांगितले होते. आमीं पाहिलेल्या प्रत्येक शेतवाडीमध्ये, कुत्रे काळजीपूर्वक पाळलेले असून त्यांची आपल्या धन्यांवर फार प्रीति असल्याचे दिसले. हे प्राणी फार इमानी असून घरादाराच्या आसपास ते खरोखर चांगलीच राखण करितात. या शेतवाडीतील दुसरी एक गोष्ट आमच्या लक्षांत विशेषेकरून आल्याशिवाय राहिली नाही. ती ही की, या शेतवाडींत शेतकरी लोकांच्या बायकांचे महत्त्व विशेष आहे. त्यांच्याकडून त्यांना घरचे व शेतीवाडीचे विशेषतः हिशेब ठेवण्याचे व इतर लिहिण्याचे कामांत किती तरी १५२