पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग पहिला. समुद्रांतील सफर. " या भूपृष्ठाच्या प्रत्येक भागांतील कोनेकोपरे देखील प्रतिवर्षी जणों जवळ जवळ आणिले जात आहेत. आगगाडी व तारायंत्र यांनी आपला विस्तार व आपला अंमल हळू हळू पण अधिकाधिक फैलावून मानवजातीच्या उन्नतीसाठी शांततेच्या युगाचा उदय त्वरित होय, असें करण्याला प्रारंभ केला आहे. महासागराच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर हांकारले जाणारे प्रत्येक गलबत, व अज्ञात प्रदेशामध्ये बनविला जाणारा प्रत्येक नवा रस्ता, यांच्या द्वारे, त्या परमेश्वराचे अधिष्ठान तयार करणाऱ्या मंडळीच्या पवित्र परिश्रमाला जणों नवा हुरूप येतो. त्या अधिष्ठानाच्या पायाचा एकही दगड आपल्या हातून बसविला गेला तर सुद्धा ही थोर मंडळी धन्यता मानून शांतीच्या पदाला पोहोंचते.” आपले घरदार, इष्टमित्र, आप्त, स्नेही, इत्यादिकांना सोडून फार दूरदेशच्या प्रवासाला निघणे हा एक मोठा कठीण प्रसंग होय; व अशा वेळी मनुष्याच्या अगदी अंतस्थ वृत्तींना भरतें आल्यावांचून राहतच नाही. विलायतेला जाण्याची मला भारी प्रबल इच्छा. तरी स० १९१३च्या वसंताच्या प्रारंभी मी आपल्या जन्मभूमीचा निरोप घेतला तो खेदावेगानेच ! मला