पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८७ ]

वर सदैव हेलावतच राहील. गोपालकृष्णाच्या चरित्रांतला प्रत्येक प्रसंग चित्तला वेडावणारा असल्यामुळे त्याचा विसर पडणें कधींच शक्य नाहीं. पंतांनी अत्यंत रसिकतेनें वर्णिलेला “ गळती नेत्रांतूनि प्रेमाश्रुज फुले शिराहूनी " इत्यादि वत्सलरसपूर्ण काव्यमय रमणीय प्रसंग, कुंजवनविहरांत आपल्या सख्यांशी खेळणारी व शेवटी “ वंशीनादनटी " वगैरे थाटांत भोजनास बसलेली कन्हय्यालालाची ती श्यामसुंदर मूर्ति, मधुवनांत " अंगवक अधरीं धरि पांवा ” अशा थाटांत उभे राहून आपल्या मनमे'हन वेणूच्या ” ध्वनीनें चराचरांस वेड लावणा-या मुरलीधराचें तें दिव्यरूप -अहाहा! यांची कधींतरी विस्मृति होईल काय ? रासक्रीडेचा तो परममंगल-प्रसंग- गौरनील वर्णोचें तें मधुर मलित, प्रभूच्या वियोगकाली होणारी गोपींची ती करुणस्थिति कंसहननार्थ सज्ज होऊन खांचास टेकून उभ्या राहिळेल्या, पीतांबर कांसेस कसलेल्या प्रभूवें तें सुंदर ध्यान, सुदामदेवाचें आदरातिथ्य करून मित्र-प्रेमाश्रु ढाळणारा श्रीकृष्ण भगवान्, शिष्टाईच्या वेळी आपल्या झगझगीत तेजाचें प्रदर्शन करून बाहेर पडणारे श्रीपती, अर्जुनास " मग सरोष बोलों आदारिलें । जैसें मातेच्या कोपों थोकलें । प्रेम अथी " ह्या प्रमाणे प्रौढ मातेच्या वत्सलतेने पण बाह्य रोषानें मंदस्मित करून उपदेश करणाऱ्या कृष्णप्रभूची रथाधिष्ठित मूर्तेि, व पांडव-प्रेमानें वेडा होऊन त्यांच्या सुखासाठीं अहर्निश झटणाऱ्या व त्यांच्या दुःखानें विव्हल होणा त्या प्रेममयाची ती प्रेमळमूर्त इत्यादि कितीतरी चित्रांचा ठसा ह्या मनोभूमिकेवर कायमचा उमटला गेला आहे व त्यांतील कित्येक तर आत्मरसाशीं एकजीव होऊन गेले आहेत !
 प्रियवाचक, अशा ह्या कृष्णाच्या चरित्राचे विहंगम दृष्टया आपणांस अवलोकन करावयाचें आहे. पण त्यापूर्वी आतांपर्यंत वर्णिलेल्या श्रीकृष्ण चरित्रांत ल त्याच्या स्वभावपरिपोषास कारणीभूत होणाऱ्या विविध छटा जमेस धरूनच वाचकांनीं पुढील ‘ अवलोकन’ वाचावें अशी सविनय विनंति आहे. श्रीकृष्णाचें मातृपितृप्रेम किती जागृत होते याची साक्ष मध्वमुनींच्या “ उद्धवा शांतवन कर जा" ह्या पद्यांत जें सद्गदित वर्णन आहे त्यावरून पटण्यासारखी आहे. श्रीकृष्णाचें आपल्या मित्रांवर व सवंगड्यांवर किती अलोट प्रेम होते याची ओळख कालियामर्दनासारखे प्रसंग व कुंजवन विहार ' - वनभोजन ह्यांसारख्या परमरसाल्हादक गोष्टी ह्यांवरून पटण्या-सारखी आहे. श्रीकृष्णाचें भक्तप्रेम किती अगाध होते हैं सुदाम देवाची कथा सांगत आहे, भगवद्गीतेचा प्रसंग वोलत आहे, श्रीकृष्णाकडून द्रौपदीचा व पांडवांचा जागो-