पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[८९ ]

सँगै खेळत होतीं ! ” मध्वमुनींची ही एकच ओळ, पण त्यांत कितीतरी करुणरस सांठविला आहे ! अशा उत्कट प्रेमाने ती बालगोपाळ मंडळी वेडी झाली होती. " चुकलिया माये | बाळ हुरुहुरु पाहे " ह्या तुकोक्तीप्रमाणे आई- लाडकी आई- क्षणैक दृष्टीआड झाली की पोरक्या पोरांप्रमाणे ज्या बालकांनीं दीनकरुणनयनानें व वदनानें “आई आई" करीत इकडे तिकडे पहावें, त्या बालकालाहि आपल्या माता-पित्यांचा विसर पाडणारी ही कान्हाई माउली किती प्रेमळ असेल याची वाचकांनींच कल्पना करावी ! खुद्द प्रभूलासुद्धां "आठवतें प्रेम जयांचें" त्या बाळांचे प्रेम प्रभूवर किती असेल बरें ? खुद्द गोपींचें कृष्णाच्या ठाय किती प्रेम होते हे पहावयाचे असेल तर नाथकृत गोपीविरहवर्णन वाचावे म्हणजे कळून येईल. वाचकांच्या प्रेमासाठीं आम्हीं तें मार्गे दिलेच आहे. "आसुवांचा पूर नयनीं | हृदय फुढे मजलागुनी" अशी त्यांची स्थिति झाली ! आम्ही वियोगकालीन होणान्या शोकादिकांवरून प्रेमाची कसोटी ठरवूं पहात आहों है योग्यच आहे असे सूज्ञ वाचकांस कळून येणार आहे. "जाळावांचून कढ नाहीं व मायेवांचून रड नाहीं " ही साधीभोळी म्हण- सुद्धां हेंच सांगते. अर्थात् ती 'रड ' किंवा तें रुदन म्हणजे " मोर्ले घातलें रडाया " नव्हे हें काय सांगायला पाहिजे ? असो. नंदयशोदा, गोपबाळें, व वजांगनाच तेवढया यमुनेच्या डोहांत कृष्णानीं उडी घेतली तेव्हा किंवा त्याहून अधिक तो मथुरेस गेला तेव्हां दु:खित होऊन त्रियोगानलानें ढळढळा रडल्या अर्से नव्हे, तर ज्या गाई- वासरांना त्यांनी अहर्निश रानांत चरावयास न्यावें तीं गाईवांससुद्धां श्रीकृष्णगमन- प्रसंगीं त्याच्या भोवतीं जमलीं व टप्प् अश्रु ढाळूं लागली ! साध्या व्यवहारांत सुद्धां जर आपणांस ही पशूंची माया पहावयास सांपडते तर श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष प्रेमाचा पुतळाच होता. शकुंतलेच्या वियोगाचे वेळीं तिच्या पदराला मागें ओढून धरणाऱ्या हरिणबालाहूनहि श्रीकृष्णाच्या अंगास अंग घांसून दनिवदनानें त्याकडे पहात अश्रु ढाळणाऱ्या गोधनाचा हा देखावा अधिक चित्त हेलावणारा नाहीं अर्से कोण म्हणेल? किंबहुना सर्व चराचर सृष्टीस कृष्णवियोगकाली दुःख होणें सुद्धां केवळ अपरिहार्य होतें व ते तसें झालेंहि " कृष्ण कृष्ण इति पल्लव डोलती " असा ज्या पल्लवांना कृष्णाचा–कृष्णनामाचा – छंद लागला होता तो श्यामसुंदर भगवान् गोकुळांतून जाणार या कल्पनेनें त्यांनी हा कृष्ण! हा कृष्ण! " म्हणून धायी धायी रडावें हैं किती साहजिक - किती काव्यमय " आहे बरें ? आणि ही गोष्ट र्हेच दाखविते कीं कन्हय्यालालावर सर्व गोकुळाचें अलोट प्रेम होतें !