पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

' मुकुंदराय " कवि ऊर्फ मिरजकरशास्त्री ( शिक्षक नू. म. वि. पुणे ) यांचा अभिप्राय:-


श्री.
रा. रा. गंगाधर रामचंद्र साने, बी. ए., यांस:-
 सा. न. वि. वि. आपण पाठविलेली 'कमला' कादंबरी मीं लक्ष-पूर्वक वाचिली. नित्याचे उद्योग संभाळून उरलेला वेळ आपण लेखन-व्यवसायांत घालवीत आहां हैं पाहून मला समाधान होतें. स्वतंत्र ग्रंथमाला काढण्याचा आपला प्रयत्न कोणाला बरें कौतुकास्पद वाटणार नाहीं ? पुस्तकाची भाषा चांगली आहे. प्रकरणेंही लहान लहान आटोपशीर असल्याने वाचतांना कंटाळा येत नाहीं. कथानक साधेंच आहे. कांहीं ठिकाणीं मात्र उत्तान वर्णनाची " झांक मारते ती नसती तर बरें. अनुभव येत जाईल तसतशीं आपलीं पुढील पुस्तकें अधिक उपयुक्त होतील असा मला भरवसा आहे.
कळावें, लोभ असावा, हे विनंति.


पुणे,
ता. २३ १

मु. ग. मिरजकर.