पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २ ]

फार आभारी आहों. त्या प्रेमळ महाभागानें प्रस्तुत ग्रंथावर सुंदर व गोड अभिप्राय लिहून देऊन आम्हांस अधिकच ऋणी करून ठेविलें आहे ! त्यांच्याचप्रमाणें विविध व्यवसाय मार्गे असूनही श्रीयुत परांजपे, प्रो. चापेकर, प्रो. लेलेशास्त्री, श्री. न. चिं. केळकर यांनींहि आम्हांस आपापले अभिप्राय लिहून दिले व प्रस्तुत ग्रंथास अधिकच शोभा आणली याबद्दल त्यांचे हि आम्ही अत्यंत आभारी आहोत. सरतेशेवटीं वर्षाची अखेर आली असूनही त्या कामाच्या गर्दीतच आर्यभूषण छापखान्यानें प्रस्तुत ग्रंथाचें काम शक्य तितकें सुबक व सुंदर करून दिलें याबद्दल त्या छापखान्याचे मालक यांचेही आभार मानणें उचित होणार आहे.

 अखेर, प्रस्तुत ग्रंथांत शक्य तितकी काळजी घेऊनही कांहीं मुद्रण-दोष राहून गेले असतील ( उदाहरणार्थ पान ४४ वर सातव्या ओळींत हृदया असतां ' असें आहे तेथें ' हृदयीं असतां ' असें पाहिजे ) तर त्यांबद्दल “ एथ न्यून तें पुरतें | अधिक तें सरतें | करुनि घ्या हें तुमतें । विनवीतसें ॥ ” यापेक्षां आम्हीं अधिक काय म्हणणार ? आणि आमचे प्रियवाचकही आम्हांस त्याबद्दल थोर मनानें क्षमा करतील अशी आम्हांस आशा आहे.

 सरते शेवटीं ' माले ' संबंधी विनंतिपर चार शब्द लिहिल्यास अप्रस्तुत होणार नाहीं. महाराष्ट्र वाङ्मयोग्रानांत नवीनच पण जोमानें अंकुरित होऊं पहाणाऱ्या प्रस्तुत मालेस सांवरण्यास सहृदय वाचक स्नेहानें आपला सहायक हात देतील व तिला अधिकाधिक वर्गणीदार मिळवून देऊन सतत प्रफुल्लित ठेवतील अशी आशा आहे. प्रस्तुत महगाईच्या काळांत पुस्तकप्रकाशनाचें कार्य किती अवघड असतें हें सहृदय वाचक जाणत असतीलच. तरी आमच्या कायम आश्रयदात्यांनी आम्हांस अजून दोन दोन तरी वर्गणीदार मिळवून देऊन “ वाङ्मयोदधीच्या कड्याकपाऱ्यातन दारिद्र व उपेक्षा यामुळे पडून राहिलेलीं अज्ञात पण पाणीदार अशीं " मोलाचीं माणिक मोती " यथाशक्ति बाहेर काढून त्यांस चमक-